Friday, December 27, 2024
Homeआरोग्यकोरोनाराज्यात कोरोनाचा विस्फोट ; मागील २४ तासात आढळले २३ हजार १७९ रुग्ण

राज्यात कोरोनाचा विस्फोट ; मागील २४ तासात आढळले २३ हजार १७९ रुग्ण

मुंबई (दि.१७) : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. काल (ता.१६) राज्यामध्ये १७ हजार ८६४ कोरोना बाधित सापडले होते, मात्र आज राज्यात २३ हजार १७९ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे.

तर आज नवीन ९ हजार १३८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आता पर्यंत राज्यात एकूण २१ लाख ६३ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण १ लाख ५२ हजार ७६० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९१.२६% झाले आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे १.७७ कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी २.२० कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय