Friday, December 27, 2024
Homeआरोग्यकोरोनाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटक सरकारने बसेस रोखल्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटक सरकारने बसेस रोखल्या

कलबुर्गी : महाराष्ट्रात होत असलेला कोरोनाचा वाढता शिरकाव लक्षात घेऊन कर्नाटक राज्य प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून उमरगा तालुक्यालगत असलेल्या कलबुर्गी मार्गावरील खजुरी व हैदराबाद मार्गावरील तलमोड सिमेवर नाकाबंदी सुरु केली होती. दरम्यान आता तर कर्नाटकातील कलबुर्गी प्रशासनाने गुरुवारी (ता.१८) दुपारपासुन महाराष्ट्रातून कर्नाटक जाणाऱ्या बसेस बंद केल्या.

औरंगाबाद – कलबुर्गी बस खजुरी बॉन्ड्रीवर पोलिसांनी थांबवली. प्रवाशांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असेल तर कर्नाटकात प्रवेश दिला जाणार असल्याचा पावित्रा घेण्यात आला. त्यामुळे बस परत उमरगा आगारात आली. प्रवाशांची अचानक झालेल्या निर्णयामुळे तारांबळ उडाली.

अनेक प्रवाशांना आडमार्गाचा अवलंब करत घर गाठण्याची वेळ आली. एक बस रोखल्यामुळे दुपारी चारनंतर उमरगा येथून जाणारी जालना – कलबुर्गी व औरंगाबाद – गाणगापूर या दोन्ही बसेस उमरगा आगार प्रशासनाने बसस्थानकातच थांबवल्या. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक प्रशासनाने खबरदारीचा घेतलेला निर्णय योग्य वाटत असला तरी कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या बसेसना मात्र मुभा दिली जाते. तिकडून येणाऱ्यांना मात्र निगेटिव्ह चाचणीचे बंधन नाही, जाणाऱ्यांना मात्र आहे. हा थोडा विरोधाभास वहानातुन प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा ठरतोय.

कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या महाराष्ट्रात अधिक आहेत, त्यांच्यासाठीही परतीच्या प्रवासादरम्यान हा नियम लागू असेल असे सांगितले जात आहे. मात्र कांही बसेसना मूभा दिली जात आहे. वास्तविकतः तलमोड बॉन्ड्रीवर कर्नाटक प्रशासनाने नाकाबंदी दरम्यान जेष्ठ नागरिक व संशयित व्यक्तीची जागेवर रॅपिड चाचणी केली जाते. मात्र खजुरी बॉन्ड्रीला तशी सुविधा नाही.

कोरोनाचा संसर्ग महाराष्ट्रातच सुरू आहे असे नव्हे तर अन्य राज्यातही कमी – अधिक प्रमाणात रुग्ण आढळून येताहेत. उमरगा येथील आरोग्यनगरीत शिवाय कोविड सेंटरमध्ये शेजारच्या कर्नाटक राज्यातील बऱ्याच गावातील रुग्ण तपासणीत पॉझिटिव्ह आढळून येताहेत, त्यामुळे खबरदारी म्हणून उस्मानाबादच्या जिल्हा प्रशासनाकडून कर्नाटकाच्या दोन्ही बॉन्ड्रीवर कधीपासुन नाकाबंदी सुरु होईल, याची प्रतिक्षा करावी लागत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय