Friday, December 27, 2024
Homeजिल्हारोहा मार्गावर मृत्यूतांडव; मद्यधुंद ट्रक चालकाने 8 जणांना उडवले

रोहा मार्गावर मृत्यूतांडव; मद्यधुंद ट्रक चालकाने 8 जणांना उडवले

रायगड : रोहा मार्गावर मृत्यूतांडव; मद्यधुंद ट्रक चालकाने 8 जणांना उडवल्याने 4 जणांचा मृत्यू झाला असूूून चौघांवर उपचार सुरु आहेेेत.

रेवदंडा – रोहा मार्गावर आज मद्यधुंद ट्रक चालकाने 8 जणांना उडवल्याची घटना समोर आली आहे. यातील 3 जणांचा जागीच ठार झाले आणि एका जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, 3 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने सर्वत्र हाहाकार उडाला असून मृतांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

संबधित ट्रकचालक वाहन घेऊन रेवदंडा येथून रोह्याच्या दिशेने चालला होता. मात्र, साळव आणि आमली येथे त्याने एका व्यक्तीला धडक दिली. त्यानंतर चेहेर येथील आणि दोन जणांना उडवले. यासंदर्भात माहिती मिळताच गावकऱ्यांना हा ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, या ट्रकने अनेक अडथळे उडवून न्हावेच्या येथे निघून गेला. तिथून जात असताना त्याने एका मोटार सायकला धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, एक महिला गंभीर जखमी झाली. या अपघातानंतरही चालकाने ट्रक थांबवला नाही. सारसोली येथे एका व्यक्तीला धडक देऊन त्याने आणखीन एका व्यक्तीला चिरडले. भरधाव वेगाने ट्रक चालवणाऱ्या या चालकाला चांडगाव नजीक स्थानिक युवकांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

रोहा मार्गावर घडलेली घटना चिंताजनक आहे. दरम्यान, आरोपीने साळव येथे घडलेल्या चुकीवर पांघरून टाकण्यासाठी तेथून पळ काढला. परंतु, मद्यधुंद आणि भरधाव वेगात वाहन चालवत असल्याने त्याने पुढे जाऊन आणखी काही लोकांना धडक दिली. ज्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला तर, अन्य चौघांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


संबंधित लेख

लोकप्रिय