Thursday, December 26, 2024
Homeराष्ट्रीयVideo : तरुणाच्या कानशिलात मारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यावर केली कारवाई ; थेट पदावरून हटविले

Video : तरुणाच्या कानशिलात मारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यावर केली कारवाई ; थेट पदावरून हटविले

रांची : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, या व्हिडीओ यामध्ये सूरजापूरचे जिल्हाधिकारी एका व्यक्तीवर दादागिरी करत मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शनिवारी संध्याकाळी समोर आल्या नंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

या व्हिडीओ मध्ये एक व्यक्ती औषधे आणण्यासाठी मेडिकल मध्ये गेला असता छत्तीसगडच्या सुरजापूरचे कलेक्टर रणबीर शर्मा यांनी त्या व्यक्तीचा मोबाईल जमिनीवर आटपून फोडला. त्यानंतर या व्यक्तीने जाब विचारला तेव्हा कलेक्टरने या व्यक्तीच्या कानाखाली मारली. एवढेच नव्हे तर आजुबाजूला असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्याने व्यक्तीला मारहाण करण्यास सांगितले. या घटनेनंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती.

सोशल मीडियावर यावर चर्चा सुरु झाल्यानंतर तरुणाला कानशिलात लगावणारे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांना गैरवर्तणुकीबद्दल तातडीने पदावरून हटवल्याचं छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान, यासंदर्भात आयएएस अधिकारी रणबीर शर्मा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून माफी देखील मागितली आहे.  

संबंधित लेख

लोकप्रिय