नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल डिझेल दरवाढीने उच्चांक गाठला होता. परंतु केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल वरील अबकारी कर कमी केल्याने नागरिकांनी मोठा दिलासा मिळणार आहे. ही दर कपात रविवार 23 मे पासुन लागू होणार आहे.
पेट्रोलवरचा अबकारी कर 8 रुपये तर डिझेलवरचा अबकारी कर 6 रुपयांनी कमी करत असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. यामुळे पेट्रोलच्या दरात 9.5 रुपयांची तर डिझेलच्या दरात 7 रुपयांची घट होईल, असं सीतारमण यांनी सांगितलं.
Video : जुन्नरच्या “या” परिसरात आढळला गवा, पाण्याच्या शोधात आल्याचा अंदाज
पावसाचा कहर : वीज पडून ३३ जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी शोक केला व्यक्त
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तब्बल 105 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !