Friday, December 27, 2024
Homeराज्यऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी वसतीगृहे उभारण्याच्या निर्णयाचे स्वागत - डॉ डी एल कराड

ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी वसतीगृहे उभारण्याच्या निर्णयाचे स्वागत – डॉ डी एल कराड

बीड : राज्य सरकारने राज्यातील ऊसतोडणी वाहतूक कामगारांच्या मुलामुलींसाठी ४१ तालुक्यासाठी ८२ वसतीगृहे उभारण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयाचे सिटू संलग्न महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना स्वागत करत असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिली आहे. 

ही वसतीगृहे संत भगवानबाबा वसतीगृह योजना या नावाने स्व. गोपीनाथराव मुडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्गत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने उभारण्यात येणार आहेत. राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांसाठी संघटनेच्या प्रदीर्घ लढ्यानंतर सन २०२१-२२ च्या हंगामावेळी झालेल्या त्रिपक्षीय करारात स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ स्थापन करायाचा व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचेकडे बाकी जबाबदारी देण्याचा निर्णय झाला होता. तर सन २०२१-२२ च्या अंदाजपत्रकात या महामंडळासाठी ऊस खरेदीवर अधिभार आणि तेवढीच रक्कम महाराष्ट्र सरकारने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या महामंडळाच्या वतीने ऊसतोडणी व वाहतूक कामगारासाठी द्यावयाच्या सामाजिक सुरक्षितता सुविधा निर्धारित करण्याची आणि तातडीने या कामगारांची नोंदणी सुरु करण्याची व त्यांना ओळखपत्र व सेवापुस्तिका देण्याची गरज आहे. 

महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना सामाजिक न्याय विभागाने याची पूर्तता लवकर करावी अशी मागणी केली आहे. संघटनेने याबाबतीत आपला पाठपुरावा अधिक गतीमान करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष कॉ. डॉ. डी.एल. कराड राज्य सरचिटणीस प्रा. डॉ. सुभाष जाधव, जिल्हाध्यक्ष कॉ. दत्तात्र्य डाके, सरचिटणीस कॉ. सय्यद रज्जाक यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय