Sunday, December 22, 2024
Homeग्रामीणनंदुरबार येथील 82 आरोग्य कर्मचारी यांना पुन्हा सेवेत सामावून घ्या : राजेंद्र...

नंदुरबार येथील 82 आरोग्य कर्मचारी यांना पुन्हा सेवेत सामावून घ्या : राजेंद्र पाडवी

तळोदा (नंदुरबार) : नंदुरबार येथील  आरोग्य खात्यातील ८२ डाॅक्टर,आरोग्यसेवक व परिचारिकांना पुन्हा  सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी बिरसा क्रांती दल जिल्हाध्यक्ष सांगली तथा जिल्हा प्रवक्ता राजेंद्र पाडवी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी नंदुरबार राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार व आरोग्य अधिकारी नंदुरबार यांच्या कडे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नंदुरबार येथील  आरोग्य विभागातील सरकारी रूग्णालयात कोवीड स्टाफ म्हणून ८२ कर्मचाऱ्यांना 3 महिन्यासाठी  सेवेत घेतले. या आदिवासी मुला मुलींनी आपल्या जीवाची पर्वा न करता रूग्णालयात आपली सेवा बजावली आहे. त्यातील बरेच डाॅक्टर, आरोग्यसेवक व परिचारिका हे पुणे, मुंबई येथून आपला जिल्हा नंदुरबार म्हणून सेवा करण्यास आले. काहींनी आपली खाजगी नोकरी सोडून नंदुरबार येथे आरोग्य सेवेत काम स्वीकारले. मात्र, ज्या कोरोना योद्धानी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा केली. 

त्या डाॅक्टर, आरोग्यसेवक, परिचारिकांना आता सेवेतून काढून टाकले आहे, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. गरज सरो वैद्य मरो या प्रमाणे जेव्हा गरज होती, तेव्हा त्यांना कामावर घेतले आणि आता काम पूर्ण झाले. म्हणून कामावरून काढून टाकले आहे. त्यामुळे या बेरोजगार मुला – मुलींनी जायचे कुठे? काय करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या युवकांना आता रोजगार नाही, नोकरी नाही आणि काम केल्याच्या पगार, मानधन सुद्धा यांना देण्यात आला नाही. त्यामुळे यांनी त्यांचा रूमभाडा, लाईटबील, इतर झालेला खर्च द्यायचा कुठून? म्हणूनच त्यांनी केलेल्या सेवाकालावधीतील सर्व पगार, मानधन तात्काळ देण्यात यावे व त्या सर्व ८२ डाॅक्टर, आरोग्यसेवक व परिचारिकांना पुन्हा आरोग्य  सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी पाडवी यांनी प्रशासनाकडे केली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय