जुन्नर : नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या श्री गजानन अपार्टमेंट मधील बंद फ्लॅटच्या – दरवाजाचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील तीन लाख रुपयांची रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे साडे एकोणचाळीस तोळे दागिने असा तेवीस लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीची घटना रविवारी (दि.१४) दुपारी झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
नारायणगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आशिष माळवदकर व जुन्नर पंचायत समितीच्या माजी सदस्या अर्चना आशिष माळवदकर यांचा येथील पुणे – नाशिक महामार्गालगत असलेल्या जीवन हॉटेलच्या बाजूला ओम नमो श्री गजानन अपार्टमेंट हा तीन मजली बंगला आहे. या पैकी तिसऱ्या मजल्यावर आशिष माळवदकर हे राहतात. तर इतर दोन मजल्यावर त्यांचे बंधू राहतात.
नारायणगाव येथील मूथा मार्केटमध्ये अर्चना माळवदकर यांचे साड्या विक्रीचे दुकान आहे. रोज सकाळी दहा ते सायंकाळी आठ या वेळेत माळवदकर दाम्पत्य हे फ्लॅट बंद करून दुकानात जातात.
नेहमी प्रमाणे रविवारी सकाळी साडेदहा वाजता आशिष व त्यांच्या पत्नी अर्चना या घराला व बेडरूमला कुलूप लावून नारायणगाव येथील कापड दुकानात गेले. सायंकाळी आठ वाजता घरी आले असता घराच्या मुख्य दरवाजाचे व बेडरूचे कुलूप तोडून चोरट्यांनी बेडरूममधील दोन कपाटातील रोख रक्कम, सोन्याचे व चांदीचे दागिने असा तेवीस लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला, या बाबतची माहिती आशिष माळवदकर यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, फौजदार सनील धनवे हे घटनास्थळी दाखल झाले.
आज (दि.१५) सकाळी ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. चोरट्यांचे ठसे मिळाले आहेत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती ताटे यांनी दिली.
दरम्यान, रविवारी दुपारी वारूळवाडी हद्दीतील सवेरा सोसायटी मधील तीन बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून चोरी झाली आहे. मात्र, सदर फ्लॅट मधील कुटुंबिय बाहेरगावी असल्याने चोरी गेलेल्या मुद्देमालाची माहिती मिळाली नाही.
नकली दागिने घरातच : चोरट्यांनी माळवदकर यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे साडे एकोणचाळीस तोळे दागिने चोरून नेले. मात्र कपाटात असलेले सोन्याचे व चांदीचे नकली दागिने बेडरूममधील गादीवर काढून ठेवले
सोन्याचे व चांदीचे नकली व खरे दागिने याची चोरट्यांना पारख असल्याचे व चोरटे सराईत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा :
सर्वात मोठी बातमी : पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार ? नव्या जिल्ह्याचं नाव शिवनेरी ?
जुन्नर शहरातील महावितरण कार्यालयासमोरच्या गटारांमध्ये कचर्याचे साम्राज्य; प्रशासनाचे दुर्लक्ष
जुन्नर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आंदोलनाचा आमदार अतुल बेनके यांचा इशारा
जुन्नर : मोफत आयुर्वेदीक अग्निकर्म व विद्घकर्म शिबिर संपन्न
व्हिडिओ: दिल्ली मेट्रो मध्ये जोडप्याचे व्हायरल लीप लॉक पाहिले का ?
देशातील लोकशाहीची वेगाने अध:पतनाच्या दिशेने वाटचाल – डॉ.विश्वंभर चौधरी
नागपूर येथे महाराष्ट्र पोलीस विभाग अंतर्गत भरती
High Court : उच्च न्यायालयात 1778 पदांसाठी भरती
लग्नातील जेवणाच्या पंगतीत वाढप्यावर चाकूहल्ला कारण एकूण थक्क व्हाल