मुंबई : राज्यातील राजकिय घडामोडी या सातत्याने बदलत असताना आता पुन्हा एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असताना आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जपानचा दौरा अर्धवट सोडून मुंबईच्या दिशेने येत असल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) महाराष्ट्र शाखेतर्फे जपान अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. दिनांक ११ ते २३ एप्रिल या कालावधीत हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. मात्र राज्यात वेगवान राजकिय हालचाली सुरू असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जपानचा दौरा अधर्वट सोडून मुंबईत येत असल्याची माहिती समोर आली आहे. ते दौऱ्याच्या 3 दिवस आधी येत आहेत. विधानसभा अध्यक्ष अचानक मुंबईत दाखल होत असल्याने तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँगेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चेला उधान आले आहे.