चिखली येथे महिला दिन- संघर्ष मित्र मंडळ ट्रस्ट तर्फे विधवा व कष्टकरी महिलांचा भेटवस्तू व किराणा वितरण कार्यक्रमात सन्मान
पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि२३-चिखली,जाधववाडी येथील संघर्ष मित्र मंडळ ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा सीता केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी चिखली प्रभागातील विधवा,एकल,परितक्त्या,घटस्फोटीत तसेच कष्टकरी महिलांचा संपूर्ण किराणा किट व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
महिला दिनाचा इतिहास याविषयी त्यांनी माहिती सिता केंद्रे यांनी दिली,त्यावेळी त्या म्हणाल्या की,आपल्या शहरात शेकडो तरुण महिलांच्या नशिबी वैधव्य आल्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक पेचप्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे.नवऱ्याने टाकून दिल्यावर अथवा त्याचा मृत्यू झाल्यावर या महिला एकाकी, परावलंबी जीवन जगत आहेत.समाजामध्ये सन्मान नसल्याने त्यांचे हाल वाईट झालेले आहेत.अनेक तरुण विधवा धुणीभांडी कष्टाची कामे करून स्वतःचा मुलांचा उदरनिर्वाह करत आहेत.मात्र त्यांच्या चारित्र्याबद्दल समाजात शंका घेतली जाते.या सर्व महिलांनी आता उंबरठा ओलांडून कौशल्य मिळवले पाहिजे.त्यासाठी व्यवसाय,कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत.असे सीता केंद्रे यांनी चिखली येथील कार्यक्रमात सांगितले.
या मेळाव्यास प्रमुख पाहुणे कल्याण माने सर(मिलेनियम किड्स इंटरनॅशनल स्कुल-पिंपळेगुरव),सदाशिव शिंदे(हवालदार-चिखली पोलीस स्टेशन),सुलक्षणा कुरणे(बचतगट-समूहसंघटिका,पिंपरीचिंचवड,मनपा),राजू भुजबळ(शिवसेना)तसेच आम आदमी पार्टीचे पदाधिकारी प्रकाश हगवणे,वैजनाथ शिरसाट,डॉ.अमर डोंगरे व शैलजा कडुलकर(वुई टुगेदर फाउंडेशन) आदी मान्यवरांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
ट्रस्टचे खजिनदार-माया सांगवे,उपाध्यक्ष-संजय कडोलकर,बालाजी कांबळे,दत्ता सांगवे,संजय टाले,ओम डांगे,सुरेश कांबळे,अनिल टाकळे,सविता कदम,राजेंद्र मुळे,राजू कांगणे,सोनाली भांगे,उपेंद्र गुप्ता,बाबूलाल चौधरी,हिराकांत भोग,बाबू मुंडे ई मान्यवर उपस्थित होते.
अहिल्या,सावित्री,जिजाऊ,इंद्रा,शक्ती,प्रगती,ज्ञानगंगा,ज्ञानज्योति,महालक्ष्मी,सरस्वती,संतोषीमाता,दुर्गा या महिला बचत गटातील २०० हुन जास्त महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या.एकूण ४० विधवा महिलांचा भेटवस्तू व किराणा किट देऊन सन्मान करण्यात आला.
माया सांगवे,रंजना कडोलकर,प्रगती मुरूमकर,शिवानी कल्याण,अश्विनी उदबुके,संध्या कांबळे,मनीषा पिंपळे,शिल्पा पिसाळ,सरला राजपूत,कांचन जाधव,पूजा मोहिते,सुनीता माने,दीपाली रासकर,कमल मिटकरी,पूजा घोखाडे,मंदा गोरे,हौसाबाई कोपनगर,सुलोचना उबाळे, वर्षा कोळेकर,अनिता गोरे,सुनंदा गोरे,सविता बाराते,छाया आबुज,प्रियांका मुंडे,बालाताई शेवाळे,सुनंदा जवंजाळ,गीता नखाते,तृप्ती पोळ,भाग्यश्री कचरे,माया कांबळे,सिमरन शेख,राईसा शेख,वैशाली यादव,सुप्रिया होळकर,लक्ष्मी मडीखांबे,सावित्री बनसोडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.अविनाश काळे,आदित्य,साहिल,प्रिन्स,छोटू,आर्यन,देवा,मयंक,समर्थ,अतुल,श्लोक यांनी वितरण व्यवस्थापन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीन शेख यांनी केले,प्रास्ताविक माया सांगवे यांनी केले. आभार प्रदर्शन रुकसाना काझी यांनी केले.