Wednesday, January 15, 2025
HomeNewsउत्तरकाशी मध्ये महाराष्ट्रतील गाडीचा भीषण अपघात !

उत्तरकाशी मध्ये महाराष्ट्रतील गाडीचा भीषण अपघात !

उत्तराखंड : उत्तरकाशी येथे गुरुवारी रात्री यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर एका खासगी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून दहा गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन पुरुषांचा आणि एका महिलेचा समावेश आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

महाराष्ट्रातील भाविकांना घेऊन बोलेरो मॅक्सी गाडी उत्तरकाशीला देवदर्शनासाठी गेले होते. गुरुवारी रात्री जानकीचट्टीहून बडकोटकडे जाताना यमनोत्री धामपासून 28 किलोमीटरवर ओझरीजवळ बोरेरो गाडीला अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने गाडी थेट दरीमध्ये कोसळली. यात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मुंबई, भंडारा आणि नागपूर येथील एकाचा समावेश आहे.

भीषण अपघात : 20 फूट खोल दरीत एसटी बस घसरली

गाडीमध्ये ड्रायव्हरसह 13 जण होते. यात चार लहान मुलांचाही समावेश आहे. समोरून येणाऱ्या बसला वळणावर साईड देत असताना ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने गाडी दरीमध्ये कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने शोध आणि बचावकार्य सुरू केले. बचाव पथकाने चार लहान मुलांसह 10 जखमी प्रवाशांना बाहेर काढले असून त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे येथे रिक्त पदांसाठी मोठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

संबंधित लेख

लोकप्रिय