Friday, December 27, 2024
Homeग्रामीणडॉ. पिंकी कथे यांना राज्यस्तरीय 'आरोग्य गौरव पुरस्कार' प्रदान

डॉ. पिंकी कथे यांना राज्यस्तरीय ‘आरोग्य गौरव पुरस्कार’ प्रदान

नारायणगाव / रवींद्र कोल्हे : जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील रेडिओलॉजिस्ट डॉ.पिंकी पंजाबराव कथे यांनी उत्तर पुणे जिल्ह्यात केलेल्या आरोग्य सेवेबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते राज्यस्तरीय ‘आरोग्य गौरव पुरस्कार’ देण्यात आला.

राजभवन मुंबई येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. मुंबईतील नवभारत टाइम्स या आघाडीच्या वृत्त समूहाने डॉ.कथे दांपत्याने गेल्या सोळा वर्षे उत्तरपुणे जिल्ह्यातील नारायणगाव जुन्नर, आळेफाटा, मचर, खेड आणि आता शिरूर या उत्तर पुणे जिल्ह्यात आरोग्य सेवेची अविरत सोळा वर्षे सेवा केल्याबद्दल रेडिओलॉजिस्ट डॉ.पिंकी पंजाबराव कथे यांना आरोग्य गौरव पुरस्कार देण्यात प्रदान करण्यात आला.

यावेळी “नवभारत वृत्तसमूहाचे कार्यकारी संचालक निमिष माहेश्वरी, स्टेट बँक ऑफ इंडियाचे सीईओ सिंग, राजेश वरलेकर, तसेच मेडिकल क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

उत्तर पुणे जिल्ह्यातील अविकासनशील शिवारात रेडिओलॉजिस्ट क्षेत्रात गेली सोळा वर्ष अविरतपणे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्याचप्रमाणे गेल्या दीड वर्षात कोरोना कालावधीत समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आधार देत सेवा करून आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ सेवा देत लोकांच्या मदतीला साथ देणाऱ्या डॉ.पिंकी पंजाबराव कथे यांची पुरस्कारासाठी निवड झाली.

डॉ.कथे डायग्नोस्टिक यांचे नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर, मंचर, राजगुरूनगर (खेड) येथे डायग्नोस्टिक सेंटर असून, शिरूर येथे आता नव्याने कार्यान्वित होत आहे. शिरूर वगळता सर्व सेंटर उत्तर पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरले आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय