Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडश्रीमती सी.के.गोयल महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग तर्फे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन 

श्रीमती सी.के.गोयल महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग तर्फे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन 

पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग, श्रीमती सी.के.गोयल कला वाणिज्य महाविद्यालय दापोडी आणि चिंचोशी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे “विशेष श्रमसंस्कार शिबिर”खेड तालुक्यातील चिंचोशी गावामध्ये रविवार दि.२६ फेब्रुवारी २०२३ ते शनिवार दिनांक ४ मार्च २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे.

श्रमसंस्कार शिबिराची मूळ संकल्पना: “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव युवकांचा ध्यास: ग्राम शहर विकास” ही आहे. विशेष श्रमसंस्कार शिबिरात सात दिवसाच्या कालावधीत दिवसभरातील दररोजच्या विविध उपक्रमांचे प्रमुख टप्पे खालील प्रमाणे असणार आहेत. 

श्रमदान अंतर्गत ग्रामस्वच्छता, वृक्ष लागवड, वनराई बंधारा बांधणे, यासारखी कामे होणार आहेत. तर दुपार सत्रात व्याख्यानमाला यामध्ये प्रबोधन उद्बोधन या अंतर्गत ग्रामस्थ व विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या मान्यवरांची व्याख्याने संपन्न होणार असून संपतराव गारगोटे – “छत्रपती संभाजी महाराज”, सुधाकर बैसाणे – “मतदान जागृती”, प्रवीण कड – “राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी घडवणारी कार्यशाळा”, सुप्रसिद्ध कवयित्री अस्मिता चांदणे – “माय मातेची कविता” , पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले – “संस्कारांची त्रिकूट” अशी विविध विषयांवर व्याख्याने संपन्न होणार आहे.

सायंकाळच्या सत्रात ग्रामस्थांसाठी मनोरंजन उद्बोधन कार्यक्रम संपन्न होणार असून त्यामध्ये समाज प्रबोधन पर प्रसंग नाट्य, चिंचोशी येथील हनुमान माध्यमिक विद्यालय, जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मिमिक्री, वैयक्तिक नृत्य सामूहिक नृत्य, विनोदी अभिनय, भारुड, मूक अभिनय, मॉडेल्स, विशेष आकर्षण म्हणून शेवटच्या दिवशी खेळ रंगला पैठणीचा-सादर करते नरेंद्र गायकवाड आणि सहकारी असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

सात दिवशी शिबिरामध्ये समाज प्रबोधन, महिला सबलीकरण, आरोग्य जागृती, जलसंधारण, ग्रामस्वच्छता, पर्यावरण जागृती, ग्रामसर्वे, व्यक्तिमत्व विकास, खेळ मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम असे विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 

शिबिराचे संयोजन जनता शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.सुभाष सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, प्रा‌.सिद्धार्थ कांबळे, प्रा. दिपाली खर्डे, प्रा. परबतराव बैसाणे, सरपंच उज्वलाताई गोकुळे, उपसरपंच मायाताई निकम, सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय