Thursday, December 26, 2024
Homeआंबेगावहिरडा व्यवसायास खरेदी विक्री, साठवणुक व वाहतूकीस विनापरवानगी मंजुरी देण्याची मागणी

हिरडा व्यवसायास खरेदी विक्री, साठवणुक व वाहतूकीस विनापरवानगी मंजुरी देण्याची मागणी

पुणे : हिरडा व्यवसायास खरेदी विक्री, साठवणुक व वाहतूकीस विनापरवानगी मंजुरी देण्याची मागणी आदिवासी एकजूट संघटना व आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील सरपंच, ग्रामस्थ यांचे सह्यांचे निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांच्याद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, हिरडा व्यवसायास खरेदी विक्री , साठवणुक व वहातुक यास विनापरवानगी मंजुरी देण्यात यावी, जेणेकरून रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल. निवेदनावर ग्रामपंचायत फुलवडे, बोरघर, आडिवरे, माळीण, कुशिरे, राजपूर, तळेघर, फलोदे, चिखली, जांभोरी, पोखरी, हातविज, आंबे, इंगळुण, भिवाडे बु, आंबोली, भिवाडे खु, शिरोली, खडकुंबे, घाटघर, देवळे या ग्रामपंचायतचे सही शिक्के देखील आहेत.

निवेदनातील मागण्या पुढीलप्रमाणे : 

1. हिरडा हे आदिवासींचे उपजीविकेचे एकमेव आर्थिक उत्पन्न देणारे फळ उत्पादन आहे. 

2. पुणे जिल्ह्यात आंबेगाव, जुन्नर, राजगुरुनगर तीन तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील ९५% हिरडा झाडे हि ७/१२ नावे असलेल्या मालकी जमिनीतील आहे.

3. ७/१२ वर हिरडा झाडे लावणे करिता शासनाकडून ठोस कार्यक्रम आखला जावा.

4. पेसा क्षेत्रातील आदिवासी शेतकरी, व्यापारी यांना विनापरवाना व विनाअट माल योग्य मार्केटला वहातुक करणे, विक्रीचे अधिकार आहेत याबाबत लेखी पत्र मिळावेत.

5. हिरडा या पिकाला फळ म्हणून गणले जावे, मालकी क्षेत्रातील हिरडयाचे नैसर्गिक नुकसान झाल्यास शासन फळबाग धारकांस जशी मदत करतो तशी मदत आदिवासी शेतकरी यांना केली जावी.

6. शासनामार्फत हिरडा खरेदी विक्री केंद्र सुरु करावी.

7. शासनाने सन २०११ मध्ये घेतलेल्या निणर्यानुसार दिलेले अधिकार व नव्याने वहातुक परवानगीचे अधिकार देऊन वनविभागास लेखी पत्र दयावे.

8. वनविभागाने हिरडा खरेदी विक्री, वहातुक यास विरोध होत असलेमुळे व्यापारी खरेदीस पुढे येत नाहीत, शासन हिरडा खरेदी करत नाही त्यामुळे आदिवासी शेतकरी अडचणीत सापडला आहे. वनविभागाचे निर्बंधन हटविण्यात यावेत.

9. आदिवासी शेतकरी व आदिवासी क्षेत्रातील प्रोड्युसर कंपनी यांना विनाअट हिरडा व्यवसाय करणेस परवानगी द्यावी.

10. पूर्वी ७/१२ ला लिखित हिरडा झाडांची नोंदी काही शेतकरी यांनी केल्या. परंतु ऑनलाईन दिसत नाहीत, ऑनलाईन नोंदी करण्यात याव्यात.

निवेदन देतेवेळी बुधाजी डामसे, दुंदा जढर, देमा रढे, वसंत नाडेकर, हरिभाऊ भालचिम उपस्थित होते.

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय