Thursday, December 26, 2024
Homeराज्यकोणताही देव ब्राम्हण नाही - जे एन यु च्या कुलगुरू शांतीश्री पंडित...

कोणताही देव ब्राम्हण नाही – जे एन यु च्या कुलगुरू शांतीश्री पंडित यांचे वक्तव्य!

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री धुळपुडी पंडित यांनी देवी देवतांच्या जातीवरून केलेल्या विधानावरून नवीन वादंग उठण्याची शक्यता आहे. कोणताही देव ब्राह्मण नाही, हिंदू देव कोणत्याही उच्च जाती मधून आलेले नाहीत .शंकर महादेव ही मागास जमातीतील असावेत कारण त्यांचा निवास हा स्मशानात असतो. असे विधान त्यांनी सोमवारी एका जाहीर कार्यक्रमात केले होते.

केंद्रीय सामाजिक न्याय और अधिकार मंत्रालयाच्या वतीने दिल्लीतील आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात डॉक्टर बी आर आंबेडकर थॉट्स ऑन जेंडर जस्टीस रेकॉर्डिंग द युनिफॉर्म सिविल कोड या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये बोलताना शांतिश्री पंडित म्हणाल्या की, मानववंशशास्त्रीयदृष्ट्या देव ब्राह्मण जातीचे नाहीत. कोणताही देव ब्राह्मण नाही .सर्वात उच्च दर्जा हा क्षत्रियांचा आहे. अगदी भगवान शिव ही अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील असावे .ब्राह्मण कधी स्मशानात बसू शकतील असे वाटत नाही. म्हणूनच देव उच्च जातीमधील नाहीत. लक्ष्मी शक्ती आणि जगन्नाथ असे सर्व देवी देवता आदिवासी आहेत . मग आपण अमाननीय असे भेदभाव अजूनही का पाळतो ?असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

स्त्रियांच्या गुलामीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की,मनुस्मृतिने स्त्रियांना दुय्यम स्थान दिले आहे .मनुस्मृतीनुसार सर्व महिला शूद्र आहेत. पती किंवा वडिलांमुळेच महिलेला तिची जात मिळते. ही बाब प्रतिगामी त्याची लक्षण आहे .असेही त्या म्हणाल्या.

संबंधित लेख

लोकप्रिय