बीजिंग : सध्याचा जमाना रोबो आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वापर आता अनेक क्षेत्रांमध्ये विविध कामांसाठी केला जात आहे.
आता चीनमध्ये चक्क न्यायदानासाठीही ‘एआय’चा वापर केला जाणार आहे. चिनी तंत्रज्ञान कंपन्यांनी जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे चालणारा न्यायाधीश विकसित केला आहे.
वाचा ! आपल्याला का वाजते थंडी?
शांघाय पुडाँग पिपल्स प्रोक्युरेटोरेटने हा यांत्रिक न्यायाधीश विकसित केला आहे. तो सादर करण्यात आलेले पुरावे, युक्तिवाद आणि वादविवादांच्या आधारे निर्णय देईल. या यांत्रिक न्यायाधीशाचे निर्णय 97 टक्क्यांपर्यंत योग्य असल्याचा दावा चीनने केला आहे.
अशा यांत्रिक न्यायाधीशांमुळे न्याय यंत्रणेवरील कामाचा बोजा कमी होईल आणि गरज पडल्यास न्यायाधीशांऐवजी या यंत्राचा वापर करण्यात येईल असा दावाही करण्यात आला आहे.
बधाई दो : राजकुमार राव, भूमी पेडणेकर यांनी घातला मोठ्या पडद्यावर धुमाकूळ !
डेस्कटॉप संगणकाद्वारे या यंत्रणेचा वापर करणे शक्य असून एकाच वेळी अब्जावधी गोष्टींची माहिती यामध्ये साठवून ठेवता येते.