Sunday, December 22, 2024
Homeआंतरराष्ट्रीययुक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान मोदींशी फोनवरून साधला संवाद, केली “हि” विनंती

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान मोदींशी फोनवरून साधला संवाद, केली “हि” विनंती

युक्रेन : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा आज तिसरा दिवस आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले केले असून कीव ताब्यात घेण्यासाठी रशियन फौजांचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभुमीवर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरू संवाद साधला आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना चर्चा करण्याचे आणि हे युद्ध थांबवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची तपशीलवार माहिती दिली. तसेच, संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारतानं युक्रेनची साथ द्यावी, अशी विनंती केली आहे.

युक्रेनच्या वृद्ध महिलेेने रशियन सैनिकाला भर चौकात झापले, म्हणाली…!

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये ११४९ जागांसाठी भरती, १२ वी पास विद्यार्थ्यांना संधी !

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमध्ये संघर्षात झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्याचबरोबर युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.

झेलेन्स्की आणि मोदी यांच्या संवादानंतर झेलेन्स्की यांनी ट्विट करून म्हटले आहे कि. ‘पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला. रशियाचे १ लाखाहून अधिक हल्लेखोर आमच्या भूमीवर असून ते नागरी वस्त्यांना लक्ष्य करत आहे. सुरक्षा परिषदेत राजकीय पाठिंबा देण्याची विनंती मोदींकडे केली. आक्रमकांना एकत्र येऊन रोखुया,’ असं झेलेन्स्की यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रशिया – युक्रेन युद्धाच्या सावटाखाली प्रेम कहानीच्या व्हायरल होत असलेल्या फोटो मागचे सत्य वाचा !

तर रशिया-युक्रेन युद्धाबद्दल भारतानं तटस्थ भूमिका घेतली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय