Monday, February 17, 2025

ब्रेकिंग : युक्रेनमधील २१९ भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं विमान मुंबईत दाखल

मुंबई : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा आज तिसरा दिवस असून, तेथील परिस्थिती गंभीर झाली आहे. आता युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असून नुकतेच २१९ भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं विमान मुंबईत दाखल झालं आहे. 

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरीकांपैकी २१९ विद्यार्थांना भारतात सुखरूपपणे आणण्यात आले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी मुंबई विमानतळावर विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तसेच पीएम मोदींनी मला विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी येथे पाठवलं आहे, असं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील आल्या होत्या.

केंद्र सरकारसह राज्य सरकारही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

दरम्यान, डॉ. एस जयशंकर यांनी ट्विट करत युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याबाबत आम्ही प्रयत्न करत असून आमची टीम 24 तास मैदानावर काम करत आहे. यावेळी डॉ एस जयशंकर यांनी ट्विट करत रोमानियाचे परराष्ट्र मंत्री Bogdan Aurescu यांचे आभार देखील मानले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles