Friday, January 3, 2025
Homeराज्यकेंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ, "या" प्रकरणी...

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ, “या” प्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिशा सालियनची बदनामी केल्या प्रकरणी सालियन कुटुंबीयांच्या तक्रारीवरून राणे पितापुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार करून हत्या झाली असा दावा केला होता. त्यावर सालियन कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. तसेच आमच्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहनही केलं होतं. याय प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांकडून दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा अहवाल मागितला होता.

पोलिसांनी महिला आयोगाला दिलेल्या अहवालात दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मालवणी पोलीस ठाण्यात सालियन कुटुंबीयांनी बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप गुन्हा दाखल केला आहे.

आपल्या देशाची अवस्था पाहून खेळाच्या मैदानात गळ्यात पडून रडले खेळाडू

युक्रेन मधील भीषण परिस्थितीत या जोडप्याने केले लग्न, कारण ऐकून तुम्ही व्हाल भावूक

प्रियांका चोप्राने युक्रेनमधील परिस्थितीवर पोस्ट केली शेअर, म्हणाली…


संबंधित लेख

लोकप्रिय