Thursday, March 20, 2025

युक्रेन – रशिया यांच्या युध्दा दरम्यान आता उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र समुद्रात डागले

उत्तर कोरिया : युक्रेन आणि रशिया यांच्यात सध्या सुरू असून तेथे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असताना उत्तर कोरियाने एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र समुद्रात डागले आहे.  

युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यात अमेरिका आणि त्याचे मित्र देश व्यस्त आहेत, अशात उत्तर कोरियाने महिनाभराच्या विश्रांतीनंतर रविवारी एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र समुद्रात डागले. 

ब्रेकिंग : युक्रेनमधील २१९ भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं विमान मुंबईत दाखल

उत्तर कोरियाची या वर्षातील ही आठवी आणि ३० जानेवारीनंतरची पहिली शस्त्र चाचणी आहे. काही तज्ञांचे म्हणणे आहे की, उत्तर कोरिया आपले शस्त्रास्त्र तंत्रज्ञान सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे आणि दीर्घकाळ रखडलेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेवर निर्बंध सोडण्यासाठी दबाव आणत आहे.

काही तज्ञांचे म्हणणे आहे कि, वॉशिंग्टनवर दबाव वाढवण्यासाठी युक्रेनच्या युध्दात अमेरिका व्यस्त असल्याचा फायदा उत्तर कोरिया घेत असून आपल्या परिक्षणाच्या चाचण्या वाढवू शकतो. या संबधीचे वृत्त एका हिंदी वाहिनीने दिले आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये ११४९ जागांसाठी भरती, १२ वी पास विद्यार्थ्यांना संधी !

रशिया – युक्रेन युद्धाच्या सावटाखाली प्रेम कहानीच्या व्हायरल होत असलेल्या फोटो मागचे सत्य वाचा !

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles