मुंबई : रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक नवीन आकर्षक योजना जाहीर केली आहे. जिओच्या 1299 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा, कॉलिंग आणि एसएमएस यांसारख्या सेवांसोबत ग्राहकांना नेटफ्लिक्सचे मोफत सबस्क्रिप्शन (Netflix for free) दिले जात आहे. जिओने हा प्लॅन त्यांच्या ग्राहकांकरिता अधिक किफायतशीर ठरावा, यासाठी डिझाइन केला आहे.
Jio Recharge प्लॅनची वैशिष्ट्ये
वैधता : 84 दिवस
डेटा : दररोज 2GB डेटा (एकूण 168GB)
कॉलिंग : अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स
एसएमएस : दररोज 100 एसएमएस
ओटीटी सबस्क्रिप्शन :
नेटफ्लिक्स: नेटफ्लिक्सचा बेसिक मोफत प्लॅन
जिओ ऍप्स: JioCinema, JioTV, JioCloud
नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन (Netflix for free) :
या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या नेटफ्लिक्स बेसिक प्लॅनद्वारे ग्राहकांना मोबाइल आणि टॅब्लेटवर 720p रेझोल्यूशनमध्ये नेटफ्लिक्सवरील संपूर्ण कंटेंटचा आनंद घेता येईल.
जिओचा खास प्लॅन का निवडावा?
1299 रुपयांच्या या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा आणि 84 दिवसांची वैधता मिळते, जे नियमित इंटरनेट वापरकर्त्यांसाठी पुरेसे आहे. याशिवाय, नेटफ्लिक्सच्या मोफत सबस्क्रिप्शनमुळे मनोरंजनासाठी हा प्लॅन अतिशय फायदेशीर ठरणार आहे. (Best Recharge For OTT)
![whatsapp link](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/whatsapp.gif)
![google news gif](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/03/google-news-GIF.gif)
हे ही वाचा :
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !
चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली
मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ‘त्या’ जमिनी परत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता
नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !
‘डॉक्टरांनी केले मृत घोषित, रूग्ण आला घरी चालत’ या अजब घटनेची जोरदार चर्चा
पुणे मेट्रो फेज 2 मध्ये सात नवीन मार्गांचा समावेश