Sunday, December 15, 2024
Homeताज्या बातम्याSomnath Suryavanshi : परभणीतील हिंसाचारानंतर उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र...

Somnath Suryavanshi : परभणीतील हिंसाचारानंतर उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र खळबळ

परभणी : संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर परभणीमध्ये झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले होते. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. मात्र अटकेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

10 डिसेंबर रोजी परभणी शहराच्या मध्यभागी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याने तणाव निर्माण झाला होता. संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या सोपान दत्तराव पवार याला पोलिसांनी घटनास्थळीच अटक केली होती. या घटनेचा निषेध करत आंबेडकरी संघटनांनी 11 डिसेंबर रोजी जिल्हा बंदची हाक दिली होती. बंद दरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरले आणि “तत्काळ न्याय” मिळावा, अशी मागणी करत घोषणाबाजी केली. मात्र, आंदोलनाला हिंसक वळण लागले, त्यावेळी तिथे मोठा हिंसाचार झाला.

या हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिसांनी अनेक दलित महिला आणि युवकांना ताब्यात घेतले. तसेच 50 हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले. त्यामध्ये कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी याला अटक करण्यात आली होती. मात्र सोमनाथ सूर्यवंशी यांचा जामीन मंजूर झाल्याची माहिती असूनही, पोलिस कोठडीतच त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

कोण होता सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) ?

सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हा आंबेडकरवादी विचारधारेतील वडार समाजातील एक उच्च शिक्षित तरूण होता. तो परभणी येथील श्री शिवाजी लॉ कॉलेज येथे कायद्याचे शिक्षण घेत होता. असे त्याच्या कॉलेजच्या ओळख पत्रावरून दिसून येत आहे.

या घटनेमुळे वडार समाजासह आंबेडकरी समाजात संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आंबेडकरी समाजाने या घटनेचा तीव्र निषेध करत न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी केली सखोल चौकशीची मागणी

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरद्वारे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू वेदनादायक आहे. त्यांचा जामीन मंजूर झाल्यानंतरही न्यायालयीन कोठडीत मृत्यू होणे धक्कादायक आहे. पोस्टमॉर्टम फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी विभागाच्या देखरेखीखाली व्हावे, तसेच चित्रीकरणही केले जावे.” अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : आज महायुती सरकारच्या नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा, पहा संभाव्य मंत्र्यांची यादी

धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप

ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी

ब्रेकिंग : …म्हणून अल्लू अर्जुनला जेलमध्ये काढावी लागली रात्र

खुशखबर : लाडकी बहीण योजनेचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार, महत्वाची माहिती समोर

लोकसभेत प्रियांका गांधी यांची मोदी सरकार जोरदार टीका, राजा वेश बदलतो…

काश्मीर मध्ये मायनस तापमान, उत्तर भारतासह महाराष्ट्रात थंडीची लाट कायम

मोठी बातमी : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक, वाचा काय आहे प्रकरण !

मोठी बातमी : सर्वात कमी वयात डी. गुकेश ने वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकत रचला इतिहास

संबंधित लेख

लोकप्रिय