Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडAjit Pawar : पराभवाचं खापर ईव्हीएम वर फोडलं जात, घोटाळा झाल्याचे पुरावे...

Ajit Pawar : पराभवाचं खापर ईव्हीएम वर फोडलं जात, घोटाळा झाल्याचे पुरावे दाखवा – अजित पवार (video)

बाबा आढाव यांचे आंदोलन मागे (Ajit Pawar)


पुणे : विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर विरोधक ईव्हीएमवर पराभवाचं खापर फोडत आहेत. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी पुण्यात ईव्हीएम विरोधात आणि निवडणुकीत पैशाचा वापर या मुद्द्यावर आत्मक्लेश आंदोलन सुरू केले. (Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी बाबा आढाव यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, आता बाबा आढाव यांनी आंदोलन मागे घेतले आहे.

अजित पवार म्हणाले की, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय या स्वतंत्र संविधानिक संस्था आहेत, संविधानाने दिलेल्या अधिकारा नुसार प्रत्येकजण आपले मत मांडू शकतो. त्याप्रमाणे बाबा आढाव यांनी आपले मत मांडले. काही गोष्टी या निवडणूक आयोगाशी तर काही सर्वोच्च न्यायालयाशी संबधित आहेत. (Ajit Pawar)

त्यामुळे त्यांना जे योग्य वाटते त्यानुसार त्यांनी निकाल दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 31 जागा आल्या. आमच्या 17 जागा आल्या. त्यावेळी कोणी काही बोलले नाही. आम्ही पण बोललो नाही. माझ्याच बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेवेळी माझा उमेदवार 48 हजारांनी पराभूत झाला होता. आता विधानसभेला मी 48 हजाराचे लीड तोडून एक लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आलो. हा जनतेचा कौल आहे. जनतेने कौल बदलला त्याला आम्ही काय करणार.. असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. (Ajit Pawar)



बाबा आढाव यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली, मतदारांना 1500 रुपयांचे प्रलोभन दिल्याचा आरोप केला.

त्यांच्या या आरोपावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, सरकारच्या कल्याणकारी योजना आताच आल्या नाहीत. संजय गांधी निराधार योजना काँग्रेसच्या काळातील आहे.
आम्ही आता महिलांना 1500 रुपये देत आहोत, परंतु महाविकास आघाडीने 3000 रुपये देण्याचे आश्वासन दिले. दिल्लीत केजरीवाल यांनी अनेक गोष्टी मोफत दिल्या आहेत. बाबा आढाव तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्यात, अशी विनंती अजित पवार यांनी केली.

अजित पवार पुढे म्हणाले की, विरोधकांच्या बाजूने निकाल लागला तर, ईव्हीएम चांगले आणि विरोधात निकाल लागला की, ईव्हीएम वाईट असे योग्य नसल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. तुमचे काही मुद्दे असतील तर ते मांडण्याची संसदेमध्ये परवानगी द्यावी, अशी विनंती पवार यांनी बाबा आढाव यांनी केली.

संबंधित लेख

लोकप्रिय