मुंबई / वर्षा चव्हाण – विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन दोन दिवस झाले आहेत. अशातच आता सीएनजीच्या दरात किलोमागे तब्बल 2 रुपयांची वाढ झाली आहे. (CNG price)
मात्र आता सीएनजीच्या दरांत वाढ झाल्यामुळे परिणामी रिक्षाच्या भाडेदरांतही वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
सीएनजीच्या दरांत वाढ झाल्यामुळे रिक्षाच्या भाडेदरांत प्रति किलोमीटर 2 ते अडीच रुपयांची वाढ करण्याची मागणी रिक्षा युनियननं केली आहे. (CNG price)
त्यामुळे आता रिक्षा प्रवास महागणार आहे. तसेच सीएनजीच्या दरांत वाढ केली असल्याने आता प्रतिकिलो सीएनजीसाठी 75 ऐवजी 77 रुपये मोजावे लागणार आहेत.
CNG price : निवडणुकीनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरात वाढ.
संबंधित लेख