हरिनाम गजरात हैबतबाबा पायरी पूजन परंपरा कायम (Alandi)
आळंदी / अर्जुन मेदनकर : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आळंदी कार्तिकी यात्रा अंतर्गत तसेच श्रींचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षातील ७२९ व्या श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळ्यास श्री गुरु हैबतबाबा यांचे पायरी पूजनाने हरिनाम गजरात वारकरी संप्रदायातील प्रथापरंपरांचे पालन करीत वीणा, टाळ, मृदंगाचा त्रिनादात श्रीक्षेत्रोपाध्ये वेदमूर्ती ब्रह्मवृंदाच्या वेदमंत्र जयघोषात आळंदी कार्तिकी यात्रेस प्रारंभ झाला. (Alandi)
श्रींचे पायरी पूजन प्रसंगी श्रींचे पुजारी अमोल गांधी, यशोदीप जोशी, श्रीनिवास कुलकर्णी, विजय कुलकर्णी यांनी वेदमंत्र जयघोष करीत पौरोहित्य केले.
या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, ऋषीकेश आरफळकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विधीतज्ज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, डॉ.भावार्थ देखणे, माजी प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष विधीतज्ञ विष्णू तापकीर, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे, पोलीस उपायुक्त राजेंद्र गौर, आळंदी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भिमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, शिवराज्याभिषेक रथपालखी सोहळ्याचे प्रवर्तक जनार्धन महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, सेवक चोपदार रामभाऊ, मानकरी बाळासाहेब उर्फ योगीराज कुऱ्हाडे, स्वप्नील कुऱ्हाडे, मंगेश आरु, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, आळंदी शहर शिवसेनेचे शहराध्यक्ष राहुल चव्हाण, काँग्रेस शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर, ज्ञानेश्वर गुळूंजकर, विठ्ठल घुंडरे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, भिमाजी घुंडरे पाटील, माजी व्यवस्थापक श्रीधर सरनाईक, भाजपचे नेते संकेत वाघमारे यांचेसह आळंदीकर ग्रामस्थ, वारकरी भाविक, दिंडीकरी उपिस्थत होते. (Alandi)
श्रींचे सोहळ्याचा प्रारंभ दिनी महाद्वारात वैभवी श्री गुरू हैबतबाबा यांचे पायरी पूजन परंपरेने वेदमंत्र जयघोषित श्रींचे पुजारी अमोल गांधी आणि सहकारी यांचे वेदमंत्र पठणात झाले. यावेळी विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांनी पौरोहित्यात सहभागी होत वेदमंत्र पठण केले. दरम्यान पायरी पूजन प्रसंगी मंदिरात महाद्वारातून प्रवेश बंद ठेवण्यात आला होता.
श्रींचे पायरी पूजनात दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तर, पुष्पहार, नववस्त्र अर्पण करीत प्रसाद वाढवत विधिवत पायरी पूजन श्रींची आरती, पसायदान झाले. तत्पूर्वी अभंग, भजन हरिनाम गजरात झाले. श्री गुरू हैबतबाबा पायरीचे परंपरेने पूजन झाल्यावर मालकांचे वतीने मानकरी, मान्यवर यांना नारळ प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री गुरू हैबतबाबा यांचे ओवरीत आरती, अभंग, दर्शन त्या नंतर दिंडीची मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. भाविक, वारकरी दिंडीकरी यांना मालकांचे वतीने महाप्रसाद झाला. श्रींचे पायरी पूजन प्रसंगी वेदमंत्र जयघोष करण्यासाठी श्रींचे पुजारी अमोल गांधी, यशोदीप जोशी, श्रीनिवास कुलकर्णी, विजय कुलकर्णी यांनी परिश्रम पूर्वक पौराहित्य केले. (Alandi)
परंपरेने माउली मंदिरात श्रीनां दुपारी महानैवेद्य झाला. मंदिरात सोहळ्यातील परंपरेने वीणा मंडपात योगिराज ठाकूर, बाबासाहेब आजरेकर यांचे तर्फे कीर्तन सेवा, रात्री हैबतबाबा यांच्या पायरीपुढे वासकर महाराज, मारुतीबुवा कराडकर, आरफळकर महाराज यांच्या तर्फे हरीजागर सेवा होत आहे.
कार्तिकी वारी कालावधीत भाविकांना खिचडी, प्रसाद, चहा वाटप तसेच आर्ट ऑफ लिविंग तर्फे पिण्याचे पाणी वाटप सेवा आणि एकादशी दिनी केळी वाटप सेवा होत आहे.
आळंदीत पुरातन रथाची चाचणी ; प्रदक्षिणा मार्गावरील अडथळे पाहणी
दरम्यांन आळंदीत पुरातन सिसम लाकडी रथाची चाचणी आळंदीतील नगरप्रदक्षिणा मार्गावरून घेण्यात आली. यावेळी रस्त्यावरील विद्युत वायर, केबल्स चे अडथळे दूर करण्याचे काम करण्यात आले. आळंदीतील रस्त्यातील विद्युत पोल कायम स्वरूपी काढून भूमिगत केबल्स टाकण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
संपूर्ण नगरप्रदक्षिणा मार्ग आणि मंदिर परिसर नदी किनारे या ठिकाणी भूमिगत विद्युत वाहिन्या विकसित करून रस्त्यातील सर्व विद्युत पोल काढून घेण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे करण्यात आली आहे.
मंदिर परिसरातील धोकादायक इमारती अडथळे, रस्ता रुंदीकरण, व्यापारी दुकाने यांचे पुनर्वसन, मंदिर परिक्रमा, भूमिगत केबल्स, तसेच आळंदीतील वीज वितरणातील अडथळे या बाबत येत्या काळात ठोस निर्णय मंदिर परिसरात होणारी भाविकांची गर्दी आणि मंदिर प्रदक्षिणा याचा विचार करून आळंदी देवस्थान ला घ्यावा लागणार आहे.
हे ही वाचा :
NFC न्यूक्लिअर फ्युल कॉम्प्लेक्स भरती, आजच अर्ज करा
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हीच कष्टकऱ्यांची इच्छा : बाबा कांबळे
पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला; बसमधील 38 जणांचा मृत्यू, 20 पेक्षा जास्त जण जखमी
Tarkarli beach : तारकर्ली एक नयनरम्य पिकनिक स्पॉट (Video)