Sunday, December 22, 2024
Homeग्रामीणबंडातात्या कराडकर यांची जीभ घसरली ,महात्मा गांधी बद्दल केले 'हे' विधान !

बंडातात्या कराडकर यांची जीभ घसरली ,महात्मा गांधी बद्दल केले ‘हे’ विधान !

 

खेड : नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असणाऱ्या बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधींच्या  अंहिसावादी विचारांनी लक्ष केलंय.

महात्मा गांधीजीचा अंहिंसावाद आणि महात्मा गांधीजीचा हिंदूत्व ही दोन्ही तशी पक्षपाती असल्याचे वादग्रस्त विधान ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी हुतात्मा राजगुरुंच्या स्मुर्तीस्थळावर केलं. तसंच, महात्मा गांधींचा म्हाताऱ्या म्हणून उल्लेखही त्यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची चिन्ह आहे. 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले ते अंहिसेच्या मार्गाने नाही तर 1942 क्रांतीकारक चळवळ उभी राहिली त्या चळवळीचा बोध इंग्रजांनी घेतला.

कुठतरी सांगितले जाते की देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘साबरमती के संत तुन्हे कर दिया कमाला मिली हमें आजादी बिना खंड बिना ढाल’ असं म्हणणं म्हणजे झाशीच्या राणीसह 350 क्रांतीकारकांचा अपमान असल्याची टीका कराडकरांनी केली. बंडातात्या कराडकरांनी हुतात्मा राजगुरुंच्या जन्मभुमीतून महात्मा गांधीच्या विचारांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगारांचा 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संप !

मोबाईलच्या अती वापरामुळे मानसिक आरोग्य का बिघडते? जाणून घ्या!

भाजप आमदारांचे विधानसभेबाहेर निदर्शने, केली ‘ही’ मागणी

संबंधित लेख

लोकप्रिय