Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडShankar Jagtap : वाकडकरांनी केलाय निर्धार; "अब की बार; शंकर जगताप होणार...

Shankar Jagtap : वाकडकरांनी केलाय निर्धार; “अब की बार; शंकर जगताप होणार आमदार”

४० वर्षांपासून घरात सत्ता असूनही विकास न करणाऱ्यांना घरी बसवणार; वाकडमध्ये दबक्या आवाजात चर्चा (Shankar Jagtap)

येणाऱ्या काळात आपला चिंचवड विधानसभा मतदारसंघ विकासाचा ‘रोल मॉडेल’ असेल – शंकर जगताप

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्व सोसायट्या समस्यामुक्त करणार – शंकर जगताप

वाकड येथील प्रचार दौऱ्यात शंकर जगताप यांनी सोसायटीधारकांना दिला शब्द

वाकडकरांनी केला शंकर जगताप यांच्या महाविजयाचा संकल्प


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि. 18 – जे आज विधानसभा निवडणुकीत विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारत आहेत, त्यांनी स्वतःच्या घरात ४० वर्ष सत्ता असतानाही वाकड परिसराचा विकास केला नाही. अशा निष्क्रिय उमेदवाराला आम्ही यावेळी चौथ्यांदा घरी बसवणार असून “अबकी बार; शंकरभाऊच होणार आमदार” असा निर्धार वाकडमधील ग्रामस्थ आणि सदनिकाधारकांनी केला आहे. (Shankar Jagtap)

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ वाकड येथील सोसायट्यांमध्ये कोपरासभेच्या माध्यमातून नागरिकांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला. या कोपरा सभांना वाकडमधील सदनिकाधारकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सभेत वाकडकरांनी हा निर्धार केला आहे.



यावेळी वाकडमधील सोसायटीधारक आणि ग्रामस्थांनी संवाद साधत आपल्या समस्या त्यांच्याकडे मांडल्या. तसेच स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी गेल्या दहा वर्षात आपल्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून या चिंचवड मतदार संघाचा आणि विशेष म्हणजे वाकड गावचा सर्वांगीण विकास केला आहे. त्यांच्यासारखाच विकास आपण कराल अशी आम्हाला खात्री आहे, अशा भावना वाकडमधील सोसायटीधारकांनी यावेळी व्यक्त केल्या. (Shankar Jagtap)

यावेळी बोलताना जगताप म्हणाले की, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सर्व सोसायटीधारकांच्या असणाऱ्या मूलभूत समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढून येणाऱ्या काळात सर्व सोसायट्यामध्ये सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून या सर्व सोसायट्या समस्या मुक्त करून आपल्या चिंचवड मतदारसंघाला विकासाचा ‘रोल मॉडेल’ बनविणार आहे.

या गावभेट दौऱ्यात वाकड येथील कॅपिटल टॉवर्स सोसायटी, शुभ लक्ष रेसिडेन्सी, ओपस 77 सोसायटी, सुखवानी स्काय पार्क सोसायटी, कुमार पिकेडीली सोसायटी, इथोस सोसायटी, डीएलवी एलवीरा सोसायटी, एसीई अलिमीटी, वेदांता टॉवर सोसायटी, आइसलँड सोसायटी, प्रिस्टीन प्रोलाइफ सोसायटी, सीगन्म सोसायटीसह वाकडमधील विविध सोसायट्यांमध्ये कोपरा बैठकीच्या माध्यमातून शंकर जगताप यांनी सोसायटीधारकांशी संवाद साधला.

यावेळी विशाल कलाटे, भारती विनोदे, राम वाकडकर, पिंपरी चिंचवड शहर आरपीआय (आठवले) शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर, प्रसाद कस्पटे, अमोल कलाटे, श्रीनिवास कलाटे, स्नेहा कलाटे, पियुशा पाटील, रणजीत कलाटे, संतोष वाकडकर, रामदास कस्पटे, अक्षय कलाटे, आकाश बोडके, सनी कलाटे, रावसाहेब डोंगरे, सुरज भुजबळ, ॲड. अमोल भुजबळ, पंकज भंडारे, विशाल वावळकर, किरण समिंदर, अथर्व कलाटे, सोन्या कुंभार, विक्रम कलाटे, प्रमोद भुजबळ, सनी भुजबळ, राकेश भंडारे, निखिल भंडारे, शुभम भुजबळ, राजेश बोबडे, अविनाश शिरसाठ, प्रथम वारभुवन, वैभव वाघमारे, किरण जाधव, करण देवकर, तेजस्विनी धोमसे, रमेश कुहाडे, आकाश बोडके, अभिमान कलाटे, सुदेश राजे, परशुराम फड, चेतन कलाटे, सुजित कांबळे, योगेश भोसले, सनी कलाटे, शीलवंत ठोंबरे, रोहित गटकळ, अतुल कलाटे, संकेत कलाटे, यश कलाटे, यांच्यासह मित्र पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या माध्यमातून मागील दहा वर्षांच्या कार्यकाळात चिंचवड विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे झाली आहेत. परंतु वाढत्या नागरिकीकरणामुळे गेल्या पाच वर्षात मूलभूत सुविधांवर अतिरिक्त ताण पडला आहे. मात्र केंद्र सरकार, राज्यातील महायुती सरकार आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने आपण मतदारसंघातील सर्व समस्या सोडविण्याच्या उद्देशाने पाऊले टाकली आहेत.

आणि त्यामध्ये आपण बहुतांशी यशस्वी झालो आहोत. येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघात प्रत्येक नागरिकाला मुबलक पाणी, चांगले रस्ते, ट्राफिक मुक्त रस्ते, प्रदूषण मुक्त शहर या सर्व सुविधा पुरविण्याकडे आम्ही प्राधान्याने लक्ष देणार आहे. आणि विकासाच्या माध्यमातून आपल्या चिंचवड मतदारसंघाचा पुन्हा एकदा चेहरामोहरा बदलून इतर मतदारसंघांसाठी आपला मतदारसंघ ‘रोल मॉडेल’ ठरेल, असा मी आपणास विश्वास देतो.

शंकर जगताप
(महायुतीचे उमेदवार)

संबंधित लेख

लोकप्रिय