Rashmi Shukla : विधानसभा निवडणुकीसाठी अवघे 15 दिवस बाकी असताना महाराष्ट्रात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केला आहे. कॉँग्रेस आणि महाविकास आघाडीने शुक्ला यांच्या बदलीची मागणी सातत्याने केली होती, आणि अखेर त्यांची ही मागणी यशस्वी ठरली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रश्मी शुक्ला यांच्या बढतीबाबत आक्षेप घेतला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 मध्ये समाप्त झाल्यानंतरही त्यांना 2026 पर्यंत नियमबाह्य बढती दिल्याचा आरोप केला होता. पटोले यांनी असा दावाही केला की, शुक्ला यांनी विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याचं काम केलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार, 5 नोव्हेंबरपर्यंत तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे राज्याच्या मुख्य सचिवांकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार आहेत, त्यानंतर नव्या पोलीस महासंचालकांची नियुक्ती केली जाईल. रश्मी शुक्ला यांची बदली करून पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार शुक्ला यांच्यानंतरच्या सर्वांत वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवावा, असे निर्देशही केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
या निर्णयाने राज्यातील निवडणूकपूर्व वातावरणात खळबळ उडाली असून, महाविकास आघाडीच्या मागणीला यश आल्याची चर्चा आहे.
Rashmi Shukla
हेही वाचा :
दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत
मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार
कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी
आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी
जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर