Wednesday, November 6, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

Manoj Jarange : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आंदोलकांचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. 288 जागांवर निवडणुकीची तयारी करणारे मनोज जरांगे पाटील यांनी 13-14 जागांवर लढण्याचा विचार केला होता. मात्र, 4 नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एकाही जागेवर उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

जरांगे पाटील म्हणाले, “आम्ही रात्री साडेतीन पर्यंत चर्चेला बसलो होतो. निवडणुकीत दलित आणि मुस्लिम उमेदवार उभे करणार होतो. मात्र, एका जातीच्या जोरावर निवडणूक जिंकणे शक्य नाही. आम्ही राजकारणात नवीन आहोत, आणि एखाद्या उमेदवाराचा पराभव संपूर्ण जातीच्या अपमानासमान आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सहभागी होणार नाही.”

जरांगे पाटील यांनी सांगितले की, “राजकारणात नवीन असताना एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे शक्य नाही. जर एखादा उमेदवार पडला, तर संपूर्ण जातीची लाज जाईल. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवणार नाही, आणि माझ्या सर्व उमेदवारांना विनंती करतो की त्यांनी आपले अर्ज मागे घ्यावेत. निवडणूक हा आपला खानदानी धंदा नाही.”

पुढे ते म्हणाले, “एका जातीच्या आधारावर कोणीही निवडून येऊ शकत नाही. राजकारणात ताकदवान पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. मी तर या राजकीय प्रवासात अजून नवखा आहे. आंदोलनात काही हजार लोक असले तरी चालते, पण निवडणुकीत लोकांची मोठी साथ हवी असते.”

मनोज जरांगे पाटील यांच्या या निर्णयाने राज्याच्या राजकारणात कोणते बदल घडणार, कोणती नवी समीकरणे निर्माण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.त्यांच्या माघारीमुळे विधानसभा निवडणुकीत कोणती उलथापालथ होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Manoj Jarange

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय