मुंबई : राज्यसभा निवडणूकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकेक मतासाठी भाजप आणि महाविकास आघाडीची जोरदार तयारी सुरू आहे. नुकतीच ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीला १३ अपक्ष आमदारांनी हजेरी लावली होती.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीला २९ अपक्ष आमदारांपैकी १३ अपक्ष आमदारांची उपस्थिती होती. तर एमआयएम आणि बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टीच्या आमदारांनी बैठकीला दांडी मारली. अशात समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी नाराज असल्याने सपाचे आमदार नेमके कोणाला मत देणार या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतू आता सपाचे नेते अबू आझमी यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून त्याची नाराजी दूर झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला आणखी दोन मते मिळणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राज्यसभा निवडणुकीसाठी सपाचे आमदार महाविकास आघाडीच्या उमेदवारांना समर्थन देणार आहेत. त्यामुळे आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. सपाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काही मागण्या केल्या होत्या. त्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या असल्याचे अबू आझमी यांनी सांगितले आहे.
अखेर राज ठाकरे यांनी दिला आदेश, मनसे आमदार करणार “या” पक्षाला मतदान
विधान परिषदेसाठी काँग्रेसने दिली “या” नेत्यांना संधी
वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 20000 ते 40000 रूपये पगाराची नोकरी
भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 400 पदांसाठी भरती, 40000 रूपये पगाराची नोकरी