Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : इतिहासाचे साक्षीदार - पुणे मुंबई रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा...

Pune : इतिहासाचे साक्षीदार – पुणे मुंबई रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा (बोपोडी) अमृत महोत्सव

तिसऱ्या पिढीचा चैतन्यमय सांस्कृतिक वारसा (Pune)

विविध संस्कृतिक कार्यक्रम संपन्न

पुणे /क्रांतीकुमार कडुलकर : लोकमान्य टिळकांनी १८९४ साली विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली तर भाऊसाहेब रंगारी यांनी दोन वर्षं आधी म्हणजेच १८९२ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती.” (Pune)

गणपती बाप्पा आणि गणेशोत्सव असे ऐकले की वेध लागतात बाप्पाच्या स्वागताचे आणि सर्वांचीच उत्साहात तयारी सुरू होते. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाची जयंती देशभरात साजरी केली जाते.

‘पुणे मुंबई रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ’ – बोपोडी गणेशोत्सवाचा ‘७५ वर्षांचा’ समृद्ध अनुभव आणि ऐतिहासिक परंपरा यावर्षी अमृत महोत्सव साजरा करत आहे.

बोपोडी येथे ४० मुंबई रोड वर राहण्याऱ्या गोणेवार परिवार यांच्या घरात पुणे मुंबई रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आणि एका गौरवशाली परंपरेचा’ श्रीगणेशा’ झाला. सुरुवातीला लोकांनी एकत्र यावे या उद्देशाने मंडळाची स्थापना करण्यात आली होती. मुंबई पुणे रोड या वसाहतीने अनेक सामाजिक आणि राजकीय स्तित्यंतरे पाहली आहेत. यामध्ये प्रत्येक वेळी पुणे मुंबई रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भूमिका महत्त्वाची राहली आहे.

पुणे मुंबई रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे नाव बोपोडी, दापोडी, खडकी आणि औंध येथील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीशी गेली ७५ वर्षे अभिमनाने जोडले गेले आहे. १९४९ साली पुणे मुंबई रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली.

यावर्षी हे मंडळ अभिमानाने अमृतमहोत्सवी गणेशोत्सव साजरा करत आहे. यंदाचा हा अमृतमहोत्सवी सोहळा दिमाखदार स्वरूपात साजरा करायचा निश्चय मंडळाने केला आहे. मात्र, हा उत्सव भव्य-दिव्य असण्यासोबतच महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडणारा हवा, असा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. त्यामुळे यावर्षी लाखो रुपये खर्च करून एखादा महागडा सेट उभारण्यापेक्षा मंडळाने काही अभिमानस्पद असणाऱ्या गोष्टी सादर निर्णय घेतला. (Pune)

यातूनच साकारले गेले आहे महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या मर्दानी खेळाचे प्रदार्शन शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जिवंत अनुभूती देतात. मंडळ कित्येक वर्ष पारंपरिक ढोल ताशा आणि लेझीम च्या नादात भव्य विसर्जन मिरवणूक करत आहे. ह्या वर्षीचे दाही दिवस विविध सामाजिक आणि करमणुकीने भरभरून आहेत.

महाराष्ट्राचे मर्दानी खेळ अणि शस्त्र कला, अमरज्योत ढोल ताशा पथक, श्रींचे आगमन आणि प्राणप्रतिष्ठा, श्रीगणेश याग, महाराष्ट्राची लोकधारा,
सामाजिक उपक्रम – NGO मार्फत, स्वरा म्युझिकल प्रस्तुत सुरमई शाम, विविध गुणदर्शन, ध्यान साधना कत्थक नृत्यकला, सुरमई शाम जपे, ऑर्केस्ट्रा, होम मिनिस्टर – पैठणीचा खेळ, स्नेह भोजन, सभासदांचा मेळावा, PlayDonia व्हिजीट, सत्यनारायण महापुजा आणि श्रींची भव्य विसर्जन मिरवणूक असा कार्यक्रम संपन्न होत आहे.

मंडळाची एक वेगळी ओळखसुद्धा आहे. ती म्हणजे मंडळातील प्रत्येकाचे शिक्षण, संस्कार, नात्यातील गोडवा, एकत्रितपणा आणि हे सर्व साधायला बाप्पावर असलेली श्रद्धा आणि अंपरापर भक्ती. प्रत्येकाने आयुष्यात खडतर प्रवास पहिला आहे.

भरपूर परिश्रम मेहनत घेतली आहे त्याचे बाप्पाशी असलेलं नातं आणि आशीर्वादाने आज आपापल्या क्षेत्रात अग्रेसर आणि प्रगतीशील आहे. म्हणूनच आमच्या बाप्पचे नाव “नवसाला पावणारा गणपती म्हणून झाली.

आज प्रत्येक कुटुंबातील तीन पिढ्या कार्यरत होत्या आणि आहेत.

कै.साथी जे.डी.सुर्यवशी, कै.साथी मधुसूदन रामतीर्थकर,कै.दिगंबर जपे व जपे बंधु, स्व. हरीशेट गोयल, स्व.हरीभाऊ सोनावणे,स्व.पाडळे बंधु, स्व. गणपत गोणेवार, स्व. माधवराव सुर्यवंशी, स्व. मटकर बंधु यांचेसह जे. डी. रामतीर्थकर, हरिभाऊ सोनावणे, हरिशेठ गोयल, कै. बजरंग शिंदे या मंडळींनी ७५ वर्षापूर्वी मंडळ स्थापन केले. अशी माहिती कार्यकारी अध्यक्ष अनिल शिंदे यांनी दिली.

सन २००० पासून मंडळाची उपनगरात एक वेगळी ओळख निर्माण झाली. ती ओळख म्हणजे आकर्षक सजावट. चलचित्र असो किंवा कुठलाही देखावा, महाराष्ट्र मंडळाची छाप अधिकच अधोरेखित होत होती. बदलत्या काळानुसार उत्सवाचे स्वरूप बदलत गेले. कार्यकर्त्यांची पिढी बदलली. मात्र तरीही धार्मिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याची परंपरा आजही कायम आहे. मंडळ अर्थ सहाय्य आणि मदत हयांतून सामाजिक बांधिलकी जपली मग ते पूरग्रस्तांसाठी नाम फौंडेशनला देणगी असो वा रक्तदान आणि श्रमदानं उत्सवानंतर हे शैक्षणिक साहित्य मंडळातर्फे गरजूंपर्यंत पोचवण्यात आले.

यंदा अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त ‘सत्कार्याची खिडकी’ हा उपक्रमही खास असणार आहे. गणपती ६४ कलेची देवता आहे. हाच धागा पकडून मंडळाने अनेक कलाकारांना आणि कलागुणांना वाव देणारे उपक्रम हाती घेणार आहे. गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्लब असणाऱ्या मुला मुलींना आर्थिक मदत करण्याचाही हेतू आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून मंडळ सामाजिक जबाबदारी पार पाडत असते. (Pune)

सध्याचे मंडळाचे मानद अध्यक्ष श्री कृष्णकुमार गोयल, अध्यक्ष ऍड. अजय जनार्दन सूर्यवंशी, उपाध्यक्ष प्रितम गोयल, सचिव ऍड. सुनील जपे, (कोऑडनेटर) प्रशांत सूर्यवंशी आणि इतर महत्वाचे कार्यकारी अनिल शिंदे, सुनील देशपांडे, संजय जपे हे अमृत महोत्सवी वर्ष मोठया जिकरीने पार पाडत आहेत.

संबंधित लेख

लोकप्रिय