Mumbai: मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रति हेक्टर 13,600 रुपये देण्यात येणार आहेत, याबाबत राज्य सरकारने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती देखील दिलेली आहे.
महाराष्ट्र सरकारने सोशल मीडियावर पोस्ट करून या निर्णयाची माहिती दिली आहे, यापूर्वी सरकारकडून नुकसान झालेल्या जिरायती पिकांसाठी प्रति हेक्टर 8,500 रुपयांची मदत दिली जात होती, परंतु आता ही मदत वाढवून प्रति हेक्टर 13,600 रुपये करण्यात आली आहे. तीन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत महत्त्वाची ठरणार आहे.
Mumbai
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला भाताचे पीक घेतले जाते, परंतु या वर्षी पावसाचा जोर वाढल्यामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे.
या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी मदत मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती