Odisha: ओडिशाच्या बौध जिल्ह्यात रविवारी रात्री एकाच कुटुंबातील चार जणांना साप चावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या सर्पदंशामुळे तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला, तर त्यांच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिकरपाडा पंचायत क्षेत्रातील चारियापाली गावात सुरेंद्र मलिक आणि त्यांचे कुटुंब रात्री झोपले होते. रात्रीच्या वेळी मुलींच्या तब्येतीत अचानक बिघाड झाला, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब जागे झाले. मुलींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे पाहून सुरेंद्रने लगेच पत्नीला मदतीसाठी बोलावले.
तथापि, जवळच एक साप रेंगाळत असल्याचे लक्षात येताच, सुरेंद्र मलिक यांना मुलींसह तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात दाखल झाल्यावर तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला, आणि वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
Odisha
सर्पदंशाच्या या घटनेमुळे चारियापाली गावात शोककळा पसरली आहे या घटनेने कुटुंब आणि गावात दुःख आणि चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी
मोठी बातमी : ‘आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेंचे’ नाव राज्यातील ‘या’ मोठ्या धरणाला
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती