Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : आळंदीत अखेरच्या श्रावणी सोमवार दिनी सिद्धेश्वरांस अभिषेख भाविकांची गर्दी

ALANDI : आळंदीत अखेरच्या श्रावणी सोमवार दिनी सिद्धेश्वरांस अभिषेख भाविकांची गर्दी

पंचक्रोशीतील शिव मंदिरात दर्शनास गर्दी (ALANDI)

आळंदी / अर्जुन मेदनकर : श्रीक्षेत्र आळंदीतील माऊली मंदिरातील पुरातन श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात अखेरच्या श्रावणी सोमवारी ( दि.२ ) श्रींचे दर्शनासह अभिषेखास भाविकांनी हरिनामाचा गजर करीत श्रीचे दर्शनास गर्दी केली. (ALANDI)

पुरातन श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात आळंदी पंचक्रोशीतून शिवभक्तांनी, माऊली भक्तांनी अभिषेक दर्शनास गर्दी केली. मंदिरात गावकरी भजन परंपरेने होत असल्याचे आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.  

 आळंदी सह पंचक्रोशीतील पुरातन पांडव कालीन शिव बेली महादेव शिवमंदिरातही भाविकांची श्रींचे दर्शनास गर्दी झाली होती. भाविकांनी रांगा लावत श्रींचे दर्शन आणि दूध महाप्रसाद घेतला. आळंदीतील इंद्रायणी नदी काठावरील श्री वैतागेश्वर महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनास स्थान महात्म्य जोपासत गर्दी केली. आळंदी शहरातील गावठाणासह विविध मंदिरात दूध महाप्रसाद वाटप उत्साहात करण्यात आले.  

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत श्रावणातील अखेरच्या पाचव्या  सोमवारी परंपरेने श्रींचा रुद्राभिषेख पूजा झाली. श्रावणातील धार्मिक महत्त्व लक्षांत घेत संस्थानने भाविकांचे दर्शनासह अभिषेख व्यवस्था केल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
 आळंदी परिसरातील विविध गावांतील भाविकांनी श्रीचे दर्शन आणि अभिषेकास मंदिरात गर्दी केली. मंदिरात चहुबाजूने भाविकांची गर्दी दिवसभर राहिली. (ALANDI)

मंदिर प्रांगणात भाविकांचे दर्शनास बारी लावण्यात आल्याने दर्शनाची सुलभ व्यवस्था झाली. व्यवस्थापक माऊली वीर यांचे हस्ते मान्यवर भाविक पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
 शिवभक्तांनी श्री सिद्धेश्वर महाराज पुरातन मंदिरात श्रीचे दर्शन आणि अभिषेख केले. पंचक्रोशीतील शिव मंदिरांत भाविकांची गर्दी श्रीचे दर्शनासह अभिषेखास होती. यात इंद्रायणी नदी काठावरील श्री वैतागेश्वर मंदिर, पांडव कालीन वडगाव येथील श्री बेली महादेव मंदिर आदी मंदिरांचा समावेश होता. धानोरे येथील धनेश्वर महाराज मंदिरातही भाविकांनी श्रींचे दर्शनाभिषेख साठी गर्दी झाली होती.

चऱ्होली बुद्रुक वाघेश्वर महाराज मंदिरात भाविकांची गर्दी ; एक लक्ष रुद्राक्ष वाटप  

चऱ्होली बुद्रुक येथेही श्रावणी सोमवार निमित्त ग्रामदैवत वाघेश्वर महाराज मंदिरात शिव दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या प्रसंगी भाविकांनी मंदिरात शिवाभिषेक केला. भाविकांचे शिव दर्शन झाल्यानंतर त्यांना मंदिरात देवस्थान तर्फे केळी व इतर उपवासाच्या पदार्थाचे महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. या मंदिरावर ग्रामस्तांतर्फे आकर्षक अशी विद्युत रोषणाई, पुष्प सजावट करण्यात आली होती.

श्रावण महिनाभर भाविकांची दर्शनास गर्दी कायम राहिली. शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त ग्रामदैवत वाघेश्वर महाराज मंदिरात शिव दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी शिव मंदिरातील शिव पिंडीवर अनेक भाविकांनी बेलपत्र, तीळ व शुभ्र पुष्प वाहिली. तर काही भाविकांनी मंदिरात शिवाभिषेक केला.

भाविकांचे शिव दर्शन झाल्यानंतर त्यांना मंदिरात देवस्थान तर्फे केळी व इतर उपवासाच्या पदार्थाचे प्रसाद म्हणून वाटप होत होते. या  ग्रामस्तां तर्फे मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई पुष्प सजावट करण्यात आली होती. श्रावण महिन्यात चऱ्होली व चऱ्होली जवळ असणाऱ्या विविध गावातून मोठ्या संख्येने नागरिक आपल्या परिवारासह वाघेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. च-होलीतील श्री वाघेश्वर मंदिरात मुख्य प्रवेशद्वाराच्या येथे मंदिर प्रशासनाकडून या मंदिरा विषयीचा माहितीचा लेख लिहिण्यात आलेला आहे.

हा लेख देवनागिरी लिपी मधील आहे. त्याचा मराठीतील अर्थबोध असा आहे की, पुणे जिल्ह्यातील च-होली येथील श्री वाघेश्वर मंदिरास महानस्थळ म्हणून संबोधले जाते. दाभाडे घराण्यातील मूळ पुरुष बज पाटील याचा मुलगा सोमाजी यांचा मुलगा कृष्णाजी दाभाडे याने श्री वाघेश्वर महानस्थळ हे मंदिर बांधले. इ.स. १७२५ मध्ये या मंदिराची उभारणी गावातील टेकडीवर झाली असल्याचे तुकाराम महाराज ताजणे यांनी सांगितले.

या मंदिराचा पुढील जीर्णोद्धार हा समस्त ग्रामस्त चऱ्होली बुद्रुक यांच्या वतीने करण्यात येत. चऱ्होली येथील वाघेश्वर महाराज शिव मंदिर जसे प्रसिद्ध आहे. तसेच येथील बैलगाडा घाट ही मोठा प्रसिद्ध आहे. चऱ्होली वाघेश्वर उत्सवावेळी येथे बैलगाडी शर्यत आयोजित केली जाते. या शर्यतीत मोठ्या प्रमाणात बैलगाडे सहभागी होत असल्याचे ग्रामस्थ वैष्णवी फाउंडेशनचे अध्यक्ष अमित तापकीर यांनी सांगिंतले.

संबंधित लेख

लोकप्रिय