Pune : एकूण एक क्षेत्रात पुणे शहर झपाट्याने वाढत आहे. झपाट्याने वाढणाऱ्या पुणे शहराच्या विकासासाठी नव्या आयामातून विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. नगरविकासाचा नवा दृष्टिकोन समोर ठेवून त्यापद्धतीने नियोजन करणे गरजेचे बनले आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते राज्य व केंद्र सरकारांसोबतच लोकसहभागचा मोठा वाटा असायला हवा, असे विचार यावेळी खराडी येथे आयोजित केलेल्या ‘न्यू पुणे नगरविकास परिषदे’च्या (न्यू पुणे अर्बन डेव्हलपमेंट कॉन्क्लेव्ह) माध्यमातून शनिवारी (ता. ३१) मांडण्यात आले.
सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. ज्यात शहराच्या शाश्वत विकासाच्या विविध मुद्द्यांवर तसेच ठोस उपाययोजनांवर चर्चा संवाद पार पडला. परिषदेच्या निमित्ताने, निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे, पोलिस आयुक्त मनोज पाटील, महाराष्ट्र आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रदीप आवटे, भवताल संस्थेचे अध्यक्ष अभिजीत घोरपडे तसेच सकाळ मीडिया समूहाचे संपादक सम्राट फडणीस, पुढारी पुणेचे निवासी संपादक सुनिल माळी, महाराष्ट्र टाइम्स पुणेचे निवासी संपादक श्रीधर लोणी व आदि मान्यवर उपस्थित होते. (Pune)
पायाभूत सुविधांना बळकटी आणण्यासाठी व येणाऱ्या काळात पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पुरेशा प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात. त्यासाठी तात्कालिक विचार न करता दीर्घकालीन व व्यापक उपाययोजना राबवाव्या लागतील. पुणे शहर सांस्कृतिक राजधानी व विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जातेच; पण आता ‘आयटी हब’चे शहर म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. वेगाने वाढणाऱ्या पुणे शहराला शाश्वत विकासासोबतच नागरी जीवन सुसह्य कसे होईल, हेही समोर ठेवून आखणी व नियोजन करावे लागणार आहे, अशा आशयाने या परिषदेत सहभागी निमंत्रित वक्त्यांनी शहर विकासाबाबतची आपली मते व्यक्त केली. प्रामुख्याने, नागरी समस्या सोडवण्यात लोकसहभागाची भूमिका, आरोग्यदायी न्यू पुण्यासाठी सार्वजनिक आरोग्याचा सर्वसमावेशक दृष्टिकोन, शहरी वनीकरण व शाश्वत विकास आणि न्यू पुण्याचा उद्देश या विषयांना धरून फलदायी चर्चा संवाद संपन्न झाला. (Pune)
“आज विविध पातळ्यांवर बदल घडत असताना नव्या पिढीतील तरुणांची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे. नवे विचार, नव्या संकल्पना, विकासाच्या नव्या शाश्वत मांडण्या यांची गरज निर्माण झाली आहे. तरुणांनी पुढाकार घेऊन यावर काम केले पाहिजे. पुणे अर्बन डेव्हलपमेंट कॉनक्लेव्हमधून या सगळ्या गोष्टींवर विचारमंथन होऊन अनेकानेक चांगल्या गोष्टी घडतील, ज्याचा थेट फायदा शहर विकासात होईल. तसेच, न्यू पुणे या व्यासपीठाच्या माध्यमातूनही विकासाच्या नव्या संकल्पना, धोरणे समोर येतील,” असा विश्वास सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केला.
यापूर्वीही २०२२ मध्ये सुरेंद्र पठारे यांच्या संकल्पनेतून पुणे नगरविकास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुणे नगरविकास परिषदेचे हे दुसरे पर्व असून, यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींसोबत नागरिकांनीही सहभाग नोंदवला. पुणे शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची ठरेल, असे म्हटले जात आहे.
Pune
हेही वाचा :
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती
मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले
“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी
Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !
शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !
खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा
कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती