पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : राज ठाकरे आदेशानुसार मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली ‘चौक तिथे झेंडा’ ही मोहीम पिंपरी चिंचवड शहरांमध्ये चालू करण्यात आलेले आहे, दिनांक 1-09-2024 रोजी संध्याकाळी सहा वाजता जाधव वाडी, चिखली, मोशी या ठिकाणी चौक तिथे झेंडा या कार्यक्रमाचे मोठ्या धुमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले. (MNS PIMPRI CHINCHWAD)
या उद्घाटना साठी सत्यम पत्रे उपविभाग अध्यक्ष, विक्रम भोसले -शाखाध्यक्ष, चेतन कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी मोशी चिखली भागातील सोसायटी धारक मोठ्या संख्येने व उत्साहाने उपस्थित होते त्याचप्रमाणे शहरातील सर्व मनसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (MNS PIMPRI CHINCHWAD)
फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये, ढोल ताशाच्या गजरामध्ये झेंड्याचे अनावरण मोशी चौकामध्ये करण्यात आले, मनसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले.
या कार्यक्रमासाठी उपशहराध्यक्ष राजू सावळे, उपविभाग प्रमुख तुषार सोनटक्के,अक्षय देसले, के के कांबळे,नितीन चव्हाण, नाथा शिंदे, कैलास दुर्गे, नारायण पठारे, संतोष यादव, आकाश सागरे, मनोज लांडगे, प्रबुद्ध कांबळे, गणेश वाघमारे, वैभव फाळके, वाहतूक सेनेच्या सुनीलजी कदम, उपविभाग अध्यक्ष निलेश नेटके, प्रथमेश घुले, शाखाध्यक्ष प्रेम पवार, काशिनाथ खजूरकर, मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.