Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : पिंपरी चिंचवड मनपा ज्युनिअर इंजिनीअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनील बेळगावकर यांची...

PCMC : पिंपरी चिंचवड मनपा ज्युनिअर इंजिनीअर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनील बेळगावकर यांची निवड

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड महानगपालिका ज्युनिअर इंजिनीअर्स असोसीएशनच्या अध्यक्षपदी सुनील बेळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. (PCMC)

गुरुवारी मनपा भवन येथे पिंपरी चिंचवड ज्युनिअर इंजिनीअर्स असोसीएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या बैठकीत सुनील बेळगावकर यांच्यासह कार्याध्यक्ष – चंद्रकांत कुंभार, सचिव – संतोष कुदळे, सहसचिव विपीन थोरमोठे, खजिनदार – महेंद्र देवरे, सह खजिनदार – सचिन मगर आणि महासंघ प्रतिनिधी – अभिमान भोसले यांची निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी अध्यक्ष बेळगावकर म्हणाले की, येणाऱ्या काळात इंजिनीअर्स व अधिकारी यांच्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान कार्यशाळा, परिषदांचे आयोजन करण्यात येईल. शहरात विकासकामे करताना अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरून काम करावे लागते. अशावेळी अनेक समस्या उद्भवतात त्यावेळी स्वतः मी आणि असोसीएशनचे सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू. देशातील विविध शहरांमध्ये विकसित करण्यात आलेल्या प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यातील योग्य ते प्रकल्प पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यासाठी असोसिएशन प्रामुख्याने प्रयत्न करील. (PCMC)

सुनील बेळगावकर यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत १६ वर्षांची सेवा झाली असून यापूर्वी त्यांनी असोसिएशनच्या विविध पदांवर काम केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार

मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात

शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती

मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले

“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी

Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !

शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !

खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय