Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात आषाढी निमित्त महापूजा

ALANDI : ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात आषाढी निमित्त महापूजा

आळंदी / अर्जुन मेदनकर : पुणे आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी येथील ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात आषाढी एकादशी निमित्त ट्रस्ट तर्फे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर, ॲड. मयूर तापकीर, कीर्ती तापकीर, शिवाजी गराडे यांचे सह तापकीर परिवाराच्या वतीने प्रथा परंपरांचे पालन करीत श्री पांडुरंगरायांची महापूजा करण्यात आली. (Alandi)

श्री विठ्ठल रुक्मिणी माता आणि माऊलींचे मूर्तीची महापूजा अभिषेक हरिनाम गजरात करण्यात आला. श्रींना दही, दूध, मधाचा, सुगंधित अभिषेक करण्यात आला. विठ्ठल – रुक्मिणी, माऊलींचा मूर्तीची महापूजा उत्साहात करण्यात आली. (Alandi)

यावेळी दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, राजेंद्र नाणेकर, साहेबराव काशीद, हर्षल अरबट, रमेश महाराज घोंगडे, शिवाजी तळेकर आदीसह माऊली भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Alandi)

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते आरती झाली. आरती नंतर महापूजा, श्रींना फराळाचा महानैवेद्य दाखविण्यात आला. सर्वस्पर्शी फाऊंडेशनचा वतीने भाविकांना आषाढी एकादशी निमित् फराळाचे वाटप करण्यात आले. (Alandi)

सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत हरिभक्त परायण कृष्णा महाराज टाले पाटील यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. दुपारी महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. मंदिरात एकादशी निमित्त आकर्षक पुष्प सजावट, रांगोळी लक्षवेधून घेत होती.

संबंधित लेख

लोकप्रिय