Saturday, March 15, 2025

Teachers vacancy : मराठवाडा विभागातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरणार

मुंबई, दि. १२ : मराठवाडा विभागातील मुख्याध्यापकांची पदे लवकरच भरण्यात येतील. याबाबत लवकरच तोडगा काढला जाईल, असे उत्तर विधानपरिषदेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. (Teachers vacancy)

मराठवाडा विभागातील जिल्हा परिषद शाळांमधील मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरण्याबाबत विधानपरिषद सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला.

केसरकर म्हणाले की, मराठवाडा विभागामध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकांची वर्ग-२ ची पदे रिक्त असल्यामुळे वर्ग च्या मुख्याध्यापकांना पदावनत करून वर्ग ३ चा दर्जा दिलेला नाही. तसेच जी शिक्षकांची पदे रिक्त आहेत ती लवकरच भरण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना योजनेतंर्गत लातूर शैक्षणिक विभागात एकूण ११६ आदर्श शाळा बांधकामे पूर्ण झाली आहेत.राज्यात जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियांनांतर्गत निजामकालीन शाळांच्या दुरूस्ती व बांधकामासाठी रूपये २०० कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत. (Teachers vacancy)

या प्रश्नाच्या चर्चेत सर्वश्री ज.मो.अभ्यंकर, किरण सरनाईक, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सहभाग घेतला.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : बागेतील आंबे खाल्ल्याने अल्पवयीन मुलांना झाडाला बांधून मारहाण

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणार रुपये 60,000 पर्यंत लाभ

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रूपये

धक्कादायक : 800 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह, 47 मुलांचा मृत्यू !

भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता-पुत्राची आत्महत्या, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! पुण्यात ‘ऑनर किलिंग’, आंतरधर्मीय विवाहाचा राग!

Related Articles

- Advertisement -

Latest Articles