Friday, September 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडALANDI : पालखी सोहळयात वडगांवकर परिवाराची ८५ वर्षांपासून वाहनसेवा

ALANDI : पालखी सोहळयात वडगांवकर परिवाराची ८५ वर्षांपासून वाहनसेवा

तिसरी पिढी सेवारत ; माजी नगराध्यक्ष वडगांवकर (ALANDI)

आळंदी / अर्जुन मेदनकर : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात श्रींचे सोहळ्यातील वैभव, लवाजमा आदी पूजा साहित्य वाहतूक करण्याची सेवा सन १९४० पासून सुरु झालेली सेवा आळंदीतील वडगांवकर परिवार यांचे कडे गेल्या ८५ वर्षा पासून आहे. (ALANDI)

आता ही सेवा तिसरी पिढी श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर ते आळंदी या मार्गावर सेवारत आहे. यात माऊलींचे पालखी सोहळ्यात सामानाची वाहतूक करण्यासाठी वाहन सेवा देत आहे. (ALANDI)

यावर्षीची सेवा सोहळ्यातील प्रभारी व्यवस्थापक श्रीधर सरनाईक, अर्जुन मेदनकर, माजी नगराध्यक्ष सुरेशकाका वडगावकर यांचे हस्ते पूजा करून सेवेस सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी जितेंद्र वडगांवकर, दत्तात्रय शिंदे, चंद्रकांत कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.(ALANDI)

पहिल्या पिढीत सन १९४० चे पालखी सोहळ्या पासून ते १९७५ पर्यंत माजी आमदार ताराचंद हिराचंद वडगांवकर, धनराज हिराचंद वडगांवकर यांनी १९७५ पर्यंत सेवा रुजू केली. त्यानंतर दुस-या पिढीने १९७५ ते २००० पर्यंत माजी नगराध्यक्ष सुरेशकाका वडगांवकर यांचे माध्यमातून पालखी सोहळ्यात सुमारे २५ वर्ष सेवाभाव जोपासत वाहन सेवा रुजू केली.

आता वडगांवकर परिवाराचे वतीने तिसरी पिढी प्रशांत वडगांवकर, जितेंद्र वडगांवकर यांचे माध्यमातून सेवेचे कार्य सन २००० साला पासून २०२४ आज तागायत दोन ट्रक वाहन सेवा देत असल्याचे माजी नगराध्यक्ष सुरेश वडगांवकर यांनी सांगितले. (ALANDI)

गेल्या तीन पिढयांपासून सुरु असलेली सेवा या पुढील काळात देखील सेवा करण्याची संधी मिळावी. माऊली आमचे कुटुंबा कडुन आषाढी यात्रा काळात श्रींचे वैभवी पालखी सोहळ्यातील साहित्य, सामान ने- आन करण्यासाठी वाहन सेवा करून घेतील. असे माजी नगराध्यक्ष सुरेशकाका वडगांवकर यांनी सांगितले.

संबंधित लेख

लोकप्रिय