Mumbai : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. काल मध्यरात्रीनंतर 1 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे मुंबईतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
मुंबईत आजही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्राच्या आणि दुपारच्या सत्रातील शाळा – महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिका प्रशासनाने परिस्थिती पाहून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
नोकरदारांना सुद्धा प्रशासनाकडून घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून भांडुप रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. कोल्हापूर ते मुंबईकडे जाणारी एक्सप्रेस तब्बल दीड तासांपासून रेल्वे रुळावर उभी आहे. पुण्याकडे जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
हेही वाचा :
धक्कादायक : भटक्या कुत्र्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी तरुणाचा तिघांवर जीवघेणा हल्ला
Mumbai : मुंबईसह कोकणात पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरू
महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य; १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर
दिवसा ढवळ्या बिबट्याचा वावर, दुचाकीस्वार थोडक्यात बचावला
मेंदू खाणाऱ्या अमिबाने 14 वर्षांच्या मुलाचा घेतला जीव
रिलसाठी स्टंट करताना दुचाकीवरून तरुणाचा भीषण अपघात, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल