Sunday, December 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडविद्यार्थ्यांनी भिती, हिंसाचार व दडपशाही विरोधात घेतली सामुहिक शपथ

विद्यार्थ्यांनी भिती, हिंसाचार व दडपशाही विरोधात घेतली सामुहिक शपथ

पिंपरी चिंचवड : 07 जून चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीज व प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिन विद्यार्थ्यांनी पोवाडा, पाळणा, छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीत गायन, विविध किल्ल्यांची माहिती आदी कार्यक्रमाद्वारे संपन्न झाला.

संस्थेत संस्थेचे सचिव डॉ. दिपक शहा समवेत मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, डॉ. पोर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरिया, डॉ. सुवर्णा गायकवाड, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा. अस्मिता यादव, डॉ. अनामिका घोष, प्रा.हनुमंत कोळी, प्रा.रोहित आकोलकर, प्रा.नेहा देशपांडे, प्रा. गीता कांबळे, प्रा.मनिषा पाटील, प्रा.संतोष उमाटे, प्रा.सुशिल भोग आदी उपस्थित होते.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1920 रिक्त पदांसाठी भरती, 13 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील बी.एड.चे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी आज समाजात स्त्रीयांवर होत असलेल्या अत्याचार बिमोड करण्यासाठी संविधानाच्या चौकटीत राहुन यापुढे आम्ही अन्याय, अत्याचार सहन करणार नाही. भविष्यात शिक्षक झाल्यावर आदर्श समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी कटीबद्ध राहू, अशी सामुहिक शपथ घेतली.

यावेळी डॉ. सुवर्णा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यीनी मनिषा लोंढे, अर्चना महाजन यांनी केले. तर आभार प्रा.अस्मिता यादव यांनी मानले.

– क्रांतिकुमार कडुलकर

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे 113 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 20000 ते 40000 रूपये पगाराची नोकरी


संबंधित लेख

लोकप्रिय