Tuesday, July 23, 2024
Homeराज्यशीना बोरा हत्येप्रकरणात धक्कादायक खूलासा, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे कनेक्शन...

शीना बोरा हत्येप्रकरणात धक्कादायक खूलासा, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे कनेक्शन…

मुंबई : शीना बोरा हत्येप्रकरणात (Sheena Bora Murder Case) आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh) यांचे शीना बोरा हत्येप्रकरणातही कनेक्शन असल्याने खळबळ उडाली आहे.

शीना बोरा बेपत्ता झाल्याची माहिती 2012 साली सर्वात अगोदर आयपीएस अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) यांना देण्यात आली होती. अशी माहिती शीना बोराचा प्रियकर राहुल मुखर्जी याने कोर्टात दिली आहे. धक्कादायक म्हणजे, परमबीर सिंग यांना माहिती असून सुद्धा त्यांनी मदत न केल्याचे समोर आले आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1920 रिक्त पदांसाठी भरती, 13 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

शीना बोरा हत्या प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयात खटल्याची सुनावणी पार पडली. त्यावेळी शीनाचा प्रियकर राहुल मुखर्जीची महत्वाची साक्ष नोंदवली. त्याने सांगितले कि, शीना बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्थानकात गेलो परंतु पोलिसांनी माझी तक्रार नोंदवून घेतली नाही. परमबीर सिंह माझ्या आईचे चांगले मित्र आहेत. मात्र त्यांनी देखील तक्रार नोंदवण्यास खास मदत केली नाही.

राहुल मुखर्जीने सांगितले कि, रायगड जिल्ह्यातल्या जंगलात 2 मे 2012 रोजी शीना बोराचा मृतदेह आढळला तेव्हा कोकण विभागाचे महासंचालक परमबीर सिंह हे होते. 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मध्ये भरती, 14 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीनं वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठलं होतं. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आलं.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे 113 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 20000 ते 40000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय