पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शहरातील (PCMC) कागद काच, पत्रा वेचक,धुणी -भांडे साफसफाई इत्यादी कष्टाची कामे करणाऱ्या शंभर महिलांना रिक्षाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे लायसन बॅच बिल्ला काढून त्यांना परमिट मिळवून देण्याचा उपक्रम कष्टकरी कामगार पंचायत व घरकाम महिला सभा या संघटनेच्या वतीने राबवण्यात आला. PCMC
सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ व माता रमाई यांच्या जयंतीच्या निमित्ताने, पिंपरी चिंचवड येथे शंभर महिलांना रिक्षाचे वितरण करण्यात आले, या कामी शासनाची कोणती मदत मिळाली नाही परंतु महिलांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम आम्ही यशस्वी केला. pcmc
आता या उपक्रमाची दखल महाराष्ट्र बरोबर देशभर घेतली जात असून महाराष्ट्र सरकारने दहा हजार पिंक रिक्षा देण्याचा निर्णय जाहीर केला असून या निर्णयाचा आम्ही स्वागत करत असून, या निर्णयाची यशस्वी अंमलबजावणी व्हावी अशी मागणी देखील करत आहोत, असे याप्रसंगी घरकाम महिला सभा अध्यक्ष आशा कांबळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले.