Friday, December 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : जीतोच्या क्रिकेट स्पर्धेत सुयोग हिट ॲंड रनला विजेतेपद

PCMC : जीतोच्या क्रिकेट स्पर्धेत सुयोग हिट ॲंड रनला विजेतेपद

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो)पिंपरी चिंचवड चॅप्टरच्या युवा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत सुयोग हिट अँड रन या संघाने ३४ धावांनी विजेतेपद पटकावले.तर उपविजेते पद धीरेन शहा स्पोर्टस् फौंडेशन यांनी मिळवले. pcmc

रावेत तेथे दोन दिवस झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये तब्बल २० संघांनी सहभागी झाले होते. विजेत्या संघाना २१ हजार आणि १५ हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेचे उदघाटन जीतो ॲडमिनिस्ट्रेटीव्ह ट्रेड फौंडेशनचे संस्थापक- संचालक राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले.

या स्पर्धेचे बक्षीस वितरण जीतो पिंपरी चिंचवड चॅप्टरचे अध्यक्ष मनीष ओसवाल,सरचिटणीस योगेश बाफना, सचिव दीपेश बाफना, महिला अध्यक्ष वैशाली बाफना यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी युवा विभागाचे अध्यक्ष सौरभ बेदमुथा, सरचिटणीस प्रणव खाबिया, समन्वयक कृतार्थ शहा,गौरव पगारीया, आयोजन समितीचेयुग कुंकूलोळ, आर्यन चोपडा, पुष्पक जैन,संकेत जैन, वर्धमान खिवंसरा, अनुज चोपडा,पायल चुत्तर,रश्मी बोरा, प्रेक्षा लुंकड, स्वीटी जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सर्वोत्कृष्ट फलंदाज पुरुष सम्यक लुनावत, सर्वोत्कृष्ट फलंदाज (महिला) – प्रेक्षा लुंकड तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज पुरुष – संकेत जैन, सर्वोत्कृष्ट महिला गोलंदाज – श्रेया गांधी, मोस्ट वॅल्युएबल प्लेयर (पुरुष) अभिषेक कटारिया, (महिला) पायल चुत्तर यांना बक्षीस देण्यात आले. pcmc

या स्पर्धेसाठी ऑरेंज कॉर्पोरेशन, शालीमार इलेक्ट्रिकल, क्रस्ना डायनोस्टिक्स यांचे प्रायोजक म्हणून विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय जाजु तर आभार प्रणव खाबिया यांनी मानले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले

धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या

पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त

अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल

जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता

ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का

मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई

माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !

ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान

NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांच्या विविध प्रश्नांसाठी मुंबई परिवहन आयुक्त येथे बैठक

संबंधित लेख

लोकप्रिय