Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याBachchu Kadu: सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

Bachchu Kadu: सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

Bachchu Kadu : अमरावती लोकसभा मतदार संघातील वातावरण चांगलेच तापले आहे. अमरावती येथील सायन्स स्कोर मैदान बच्चू कडू यांनी 24 तारखेला सभेसाठी बुक केले होते. तसेच त्यासाठी मैदानाचे पैसेही देखील भरले होते. मात्र आता सुरक्षेच्या कारणास्तव बच्चू कडू यांची सभा रद्द करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे. त्यामुळे अमरावतीतील मैदानावरून चांगलाच राडा होताना दिसत आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने अमरावतीत अनेकांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे. महायुतीत असलेले बच्चु कडू यांनी देखील राणा यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बच्चू कडू यांनी 24 तारखेसाठी सायन्स कोर मैदान बुक करून त्याचे पैसे ही भरले. मात्र याच मैदानावर गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे. त्यामुळे ऐन वेळी सुरक्षेच्या कारणास्तव बच्चू कडू यांना परवनगी नाकारल्याचे बघायला मिळत आहे.

दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी लायन्स स्कोर मैदानावरून आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पोलिस प्रशासनाची चांगली धावपळ झाली. या मैदानावर बराच पोलिस आणि बच्चु कडू यांच्यात बाचाबाची झाल्याचे बघायला मिळाले.

त्यावेळी बच्चू कडू यांनी पहिला आम्हाला परवानगी दिली आणि नंतर ती रद्द करून त्याच ठिकाणी अमित शाहांच्या सभेला परवानगी दिल्याने ते संतापले. कायदा राखण्याचं काम करणाऱ्या पोलिसांनीच आता कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा आरोप बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला. तसेच, आमच्याकडे परवानगी असताना आमची सभा रद्द का? असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.

बच्चू कडू यांनी मैदान ताब्यात घेण्यासाठी मैदानावरच ठिय्या आंदोलन केले आहे. अखेर पोलिसांनीच आता भाजपचे गमचे गळ्यात घेऊन यावे आणि पोलिस भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

निवडणूकीपुर्वीच भाजपचा उमेदवार विजयी, काँग्रेस आक्रमक ‘हा हुकूमशहाचा चेहरा’

दिल्लीचे तख्त पलटवु शकतो, ही महाराष्ट्राची ताकद आहे – डॉ. अमोल कोल्हे

मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

७५ टक्क्‍यापेक्षा जास्‍त मतदान टक्केवारी साध्‍य करणाऱ्या केंद्राचा होणार सन्‍मान

संबंधित लेख

लोकप्रिय