१. सीबीएसई निकाल जाहीर; यंदा ८८.८७ % टक्के निकाल.
१० लाख ५९ हजार ८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले, एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ८८.७८% आहे. २०१९ च्या तुलनेत हे ५.३८ % जास्त आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९२.१५% तर मुलांची ८६.१९% राहिली.
२. ट्विटरवर #BurnUGCGuidelines मोहिम ; देशभरात गाईडलाईन जाळून निषेध.
आज शिक्षण बचाव मंच आणि स्टुडंट्स फेडरेशनने १० जुलै पासून १४ जुलैपर्यंत युजिसीने मार्गदर्शक सुचना मागे घ्यावे, यासाठी देशभरात आंदोलन केले जात आहे. आज ट्विटरवर #BurnUGCGuidelines मोहिम राबवत देशभरातील अनेक ठिकाणी SFI ने गाईडलाईन जाळून निषेध करण्यात आला. महाराष्ट्रात ही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिसून आला.
३. आयसीएआय ने सीए ची परीक्षा रद्द केली.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडियाने ची सीए परीक्षा रद्द केली आहे. परीक्षा मे २०२० पासून जुलै या कालावधीत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे संस्थेने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडण्याचा किंवा बदलण्याचा पर्यायही देण्यात आला होता. आता ही परीक्षा नोव्हेंबर २०२० च्या परीक्षा सोबत विलीन करण्यात येणार आहे.
४. सरकारने शाळांवर कारवाई करु नये.
मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले आहे की, ज्या शाळा दोन व त्याखालील वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवत आहेत अशा शाळांवर राज्य सरकारने कोणतीही कारवाई करु नये. ऑनलाइन वर्गात येऊ न शकणाऱ्या मुलांविरोधात कोणतीही कार्यवाही शाळेने करू नये असे ही कोर्टाने शाळांना व त्यांचा संस्थांना सांगितले आहे. १५ जून रोजी महाराष्ट्र सरकारने एक शासकीय आदेश जारी केला आणि ज्यात शाळांना वर्ग दोन किंवा त्या खाली वर्गांना ऑनलाइन शिकवण्यात बंदी घालण्यात आली.
५. ”शाळा बाहेरची शाळा’ उपक्रम.
अंगणवाडी व प्राथमिक शालेय विभागीय आयुक्तालय “शाळा बाहेरची शाळा” उपक्रम राबवित आहे. पालकांचा व्हाट्सएप ग्रुप सरपंचांनी तयार केला असून यामध्ये दररोज विद्यार्थ्यांना शिकवले जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी ग्रामपंचायतीकडूनही गावातील भिंतींवर चित्रे काढून ‘बोलके भिंती’ हा उपक्रम ही राबविण्यात येत आहे.
६. विद्यार्थ्यांना फीसाठी त्रास देऊ नका.
उच्च न्यायालयाने खासगी मेडिकल कॉलेजला शुल्कासाठी विद्यार्थ्यांना त्रास न देण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात फी चा काही भाग राज्य सरकार भरणार होती. पण सरकारने ती फी आतापर्यंत भरली नाही. त्यामुळे खासगी मेडिकल कॉलेज आता सरकारने फीस न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना संपूर्ण फी भरण्यास सांगत आहेत.
७. CBSE १० वी चा उद्या निकाल.
उद्या १५ जुलै रोजी CBSE दहावी चा निकाल जाहिर करणार अस केंद्रीय मानव संसाधन मंत्री, रमेश पोखरियाल यानी ट्वीटच्या माध्यमातून सांगितले आहे.
संकलन – अमित हटवार