Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

3 पोलीस हवालदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; एकाला पोलिस कस्टडी

पुणे : सध्या राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी वाढत चाललेल्या असून लाचखोरांवर कारवाई केल्या जात आहेत. पुणे शहरातील 3 पोलीस हवालदार देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. कारला झालेल्या अपघाताची तक्रार दाखल करुन घेण्यासाठी 13 हजार रुपयांची लाच घेणार्‍या पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पहाटे सापळा रचून रंगेहाथ पकडले. तसेच त्याला सहाय्य करणार्‍या अन्य दोन पोलीस हवालदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---Advertisement---

येरवडा पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे पोलीस हवालदार राजेंद्र दीक्षित असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस हवालदार जयराम सावलकर आणि पोलीस हवालदार विनायक मुधोळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांचा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या कारला अपघात झाला होता. या अपघाताची तक्रार दाखल करण्यासाठी तिघा पोलीस हवालदारांनी तक्रारदाराकडे 20 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर सोमवारी त्याची पडताळणी केली. त्यात त्यांनी तडजोड करुन 13 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. रात्री उशिरापर्यंत पोलीस नजर ठेवून होते. पोलिसांनी तक्रारदार याची तक्रार मध्यरात्रीनंतर दाखल करुन घेतली. त्यानंतर हवालदार राजेंद्र दीक्षित यांनी तक्रारदाराकडून 13 हजार रुपये स्वीकारल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्यांच्यावर येरवडा पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये हवालदार राजेंद्र दीक्षित याला अटक करून आज 13 जून 2023 रोजी विशेष न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 16 जून 2023 पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करत आहेत.

---Advertisement---

सदरची कारवाई पोलीस उप.आयुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, मुकुंद आयाचित, पोलीस शिपाई भूषण ठाकूर, पांडुरंग माळी यांनी ही कारवाई केली.

शासकीय अधिकारी/कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

हे ही वाचा :

खूशखबर : पाचवी, आठवीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती रकमेत वाढ

ब्रेकिंग : मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात, थरारक व्हिडिओ व्हायरल

खळबळजनक : किसान आंदोलनावेळी मोदी सरकारकडून ट्विटर बंद करण्याची धमकी

शिंदे गटाच्या 6 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार ?

गणपतीपुळे : समुद्राने ओढून घेतले पर्यटकांचे मोबाईल, पैसे ; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध

भटक्या जमाती, धनगर व तत्सम लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालन अर्थसहाय्य योजना सुरु करणार

बारावीची फेर परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles