मुंबई : शिवशाही व्यापारी संघ प्रदेशाध्यक्ष धनंजय ढावरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेशाध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या प्रमुख सुचनेने व वरीष्ठ उपाध्यक्ष अनंत कुलकर्णी यांच्या आनुमोदनाने योगेश भाऊराव घोरपडे यांची मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी मध्यवर्ती कार्यालय दादर मुंबई या ठिकाणाहून जाहीर केली. Yogesh Ghorpade has been elected as the Regional Working President of Shivshahi Traders Association
नवनियुक्त मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष योगेश घोरपडे यांनी सर्वसामान्य जनता व्यापारी वर्ग दिव्यांग बंधू तृतीयपंथी भगिनी व इतर असंघटित कामगारांच्या प्रश्नांची शासन दरबारी मांडणी करून ती सदैव सोडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.