Wednesday, June 26, 2024
Homeताज्या बातम्याPune : सुरेंद्र पठारे फाऊंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Pune : सुरेंद्र पठारे फाऊंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Pune : सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ काल (दि. १५ जून) येरवडा येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर येथे संपन्न झाला. यावेळी ८८२ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व भेटवस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला. नुकत्याच दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी या सत्कार समारंभ आयोजन करण्यात आले होते. समारंभाच्या प्रसंगी विद्यार्थी व पालकांसोबत विविध शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य तसेच शिक्षकही उपस्थिती होते. (Pune News)

समारंभाचे अध्यक्ष म्हणून वडगावशेरी मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे तसेच नामवंत व्याख्याते गणेश शिंदे व राहुल राजगुरू, सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.

“प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थीनीमध्ये काहीतरी वेगळेपण असते. ज्या दिवशी तुम्हाला हे वेगळेपण सापडेल, त्या दिवशी तुम्हाला तुमच्या वाटा सापडतील आणि जगणे सुंदर होईल. मुलांनी मोठे होऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे, नाव कमवावे इतकीच अपेक्षा आई वडिलांची असते व ती पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून झटले पाहिजे”, या शब्दांत व्याख्याते गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना उद्देशून व्याख्याते राहुल राजगुरू यांनीदेखील करीयरच्या दृष्टीने मोलाचा संदेश देताना ते म्हणाले, “तुमच्या आवडत्या क्षेत्रात तुमचे करियर घडवा, कारण पुढे जाऊन तीच गोष्ट तुमचे भविष्य उज्ज्वल करणारी ठरेल.” तसेच, महापुरुषांचे आपल्या आयुष्यातील असलेले महत्त्वही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

“विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे व त्यांनी मिळवलेल्या यशाचे कौतुक व्हावे, हा उद्देश ठेवून या सत्कार समारंभाचे आयोजन केले. विद्यार्थ्यांसोबतच त्यांना घडविणाऱ्या गुरुजनांचाही सन्मान करण्यात आला आहे. उद्याच्या भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करता आला याचा आनंद आहे”, असे मत फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांनी व्यक्त केले. समारंभाचे अध्यक्ष बापूसाहेब पठारे यांनीही विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : EVM मशीन AI द्वारे हॅक होऊ शकते इलॉन मस्क यांच्या दाव्याने खळबळ

ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : भारतीय तटरक्षक दलात 320 पदांची मोठी भरती

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत 164 पदांची भरती

ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये

सिक्किममध्ये तिस्ता नदीचा कहर, अनेक भाग पाण्याखाली; 1500 पर्यटक अडकले!

ब्रेकिंग : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची, बातमी शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय

अंघोळीच्या साबणाचे तुकडे फेकून देताय ? असा करा उपयोग, हा व्हिडिओ तुमच्यासाठी

ब्रेकिंग : मोफत आधार कार्ड अपडेट संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

‘या’ दोन फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय